दूधासह दुग्धजन्य पदार्थ जास्तवेळ टिकवून ठेवण्यासाठी 'ही' टेक्निक माहीत करून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 06:44 PM2020-08-17T18:44:53+5:302020-08-17T18:51:10+5:30

ृदूध आणि दुधापासून तयार झालेले पदार्थ कसे टिकवून ठेवावेत याबाबत सांगणार आहोत. 

Right way to store dairy products, technique to store dairy products longer | दूधासह दुग्धजन्य पदार्थ जास्तवेळ टिकवून ठेवण्यासाठी 'ही' टेक्निक माहीत करून घ्या

दूधासह दुग्धजन्य पदार्थ जास्तवेळ टिकवून ठेवण्यासाठी 'ही' टेक्निक माहीत करून घ्या

googlenewsNext

दूधासह पनीर, दही, तुप यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांची आवश्यकता आपल्याला रोजचं भासते. पण बाजारातून आणल्यानंतर हे पदार्थ ठेवण्यासाठी तुम्ही निष्काळजीपणा केलात तर लगेचच खराब होऊ शकतात. दूध फाटणं, दही खराब होणं, अशी स्थिती अनेकदा उद्भवते. आज आम्ही तुम्हाला दूध आणि दुधापासून तयार झालेले पदार्थ कसे टिकवून ठेवावेत याबाबत सांगणार आहोत. 

दूध

दूध प्रत्येक घरामध्ये रोज वापरलं जातं. दूध फाटू नये म्हणून विकत घेताना पिशवी किंवा कॅनवरील  एक्सपायरी डेट पाहून घ्या. त्यानंतर स्वच्छ  पातेल्यात उकळवून घ्या. दूध उकळ्यानंतर थंड करून फ्रीजमध्ये ठेवू शकता. लक्षात ठेवा अनेकदा दुधाचं भांड स्वच्छ केलं नसेल किंवा घासताना अर्धवट स्वच्छ झालं असेल तर दूध खराब होण्याची शक्यता असते. म्हणून दुधाचं भाडं स्वच्छ धुवून आणि पुसून मगच वापरा. 

पनीर 

पनीर एक दिवस किंवा त्याहीपेक्षा कमी टिकते. रेफ्रिजरेटर (पाच ते सात अंश से.) तापमानास पनीर सहा दिवस टिकत असले तरी त्याचा पृष्ठभाग 3 दिवसांनी पिवळा पडण्यास व पनीर थोडे कडक होण्यास सुरुवात होते. हे टाळण्यासाठी पनीर ऍल्युमिनियम फॉईलमध्ये पॅक केल्यास रेफ्रिजरेशन तापमानास सहा दिवसांपर्यंत उत्तम स्थितीत टिकते. पनीर टिकवून ठेवण्यासाठी ब्लॉटिंग पेपरमध्ये ठेवावे.

The Right Way to Store Dairy Products

तूप

आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तुपाचं सेवन फायदेशीर ठरतं. तुपात अनेक पोषक घटक असतात. रुम टेंमरेचरवर तूप दीर्घकाळ राहू शकते. हवाबंद डब्बात ठेवल्यास जास्त दिवस राहिल. तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता. अनेकदा ओलावा येण्याची शक्यता असते. 

दही

दह्यासाठी पॉलिस्टरीनचे कप बऱ्याच ठिकाणी वापरतात. पॉलिप्रोपॅलीन, पीव्हीसी यांचाही वापर करता येईल. पॉलिस्टरीन किंवा पॉलिप्रोपॅलिनच्या कपात दही पॅक करून फ्रिजमध्ये ठेवल्यास, सहा ते सात दिवसांपर्यंत टिकू शकते. 

चहासोबत कुरकुरीत मक्याची भजी खाल तर खातच राहाल; नक्की ट्राय करा 'ही' चमचमीत रेसिपी

चवीला एकदम बढीया; खमंग, खुसखुशीत अळूवड्या, एकदा खाल खातच रहाल.....

Web Title: Right way to store dairy products, technique to store dairy products longer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.