उपवासाचं तेच तेच खाऊन कंटाळले असाल तर ट्राय टेस्टी साबुदाणा टोस्ट, जाणून घ्या रेसिपी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 12:07 PM2024-10-04T12:07:32+5:302024-10-04T12:09:48+5:30

Sabudana Toast Recipe : साबुदाणा खिचडी, भगर, वेगवेगळ्या फळांचं सेवन केलं जातं. अशात तुम्हाला उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर वेगळी डिश आम्ही सांगणार आहोत. 

Sabudana toast recipe for Navratri fast | उपवासाचं तेच तेच खाऊन कंटाळले असाल तर ट्राय टेस्टी साबुदाणा टोस्ट, जाणून घ्या रेसिपी!

उपवासाचं तेच तेच खाऊन कंटाळले असाल तर ट्राय टेस्टी साबुदाणा टोस्ट, जाणून घ्या रेसिपी!

Sabudana Toast Recipe : नवरात्रीचे नऊ दिवस फारच पवित्र मानले जातात. नऊ दिवसांचा हा उत्सव भारतांमध्ये फारच उत्साहाने साजरा केला जातो. बरेच लोक नऊही दिवस उपवास करतात. लोक उपवासाचे वेगवेगळे पदार्थ सेवन करतात. साबुदाणा खिचडी, भगर, वेगवेगळ्या फळांचं सेवन केलं जातं. अशात तुम्हाला उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर वेगळी डिश आम्ही सांगणार आहोत. 

उपवासादरम्यान साबुदाणा सगळ्यात जास्त खाल्ला जातो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाणा वडे खायला आवडतात. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, साबुदाण्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जाऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला टेस्टी साबुदाणा टोस्ट कसे बनवायचे हे सांगणार आहोत.

साबुदाणा टोस्ट एक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे. जी फार कमी वेळात तुम्ही बनवू शकता. या रेसिपीसाठी तुम्हाला केवळ बटाटे, मसाला आणि साबुदाण्याची गरज पडेल.

कसे बनवाल साबुदाणा टोस्ट?

साबुदाणा टोस्ट बनवण्यासाठी सगळ्यात आधी एक वाटी भिजवलेला साबुदाणा, कुस्करलेले बटाटे, भगराचं पीठ, बारीक केलेले शेंगदाणे आणि मसाले हवेत. एक पॅन घ्या आणि त्यात तेल टाका, बारीक केलेलं आलं, जिरे, शेंगदाणे, हींगाचा तडका तयार करा. नंतर हा तडका साबुदाण्यावर टाका. चांगलं मिक्स करा. आता या मिश्रणाचा एक फ्लॅट टोस्ट शेप तयार करा. हे ग्रील सॅंडविच मेकरमध्ये ठेवा. जर तुमच्याकडे ग्रील सॅंडविड मेकर नसेल तर तुम्ही हे पॅनमध्येही बनवू शकता. नंतर तुमच्या आवडीच्या चटणी किंवा दह्यासोबत याचं सेवन करू शकता. 

Web Title: Sabudana toast recipe for Navratri fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.