प्रत्येक मूडनुसार 10 नवीन पिझ्झा लाँच करण्याकरिता ‘पिझ्झा हट’मध्ये सैफ अली खान आणि शहनाज गिल यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2023 06:41 PM2023-05-05T18:41:35+5:302023-05-05T18:45:15+5:30

पिझ्झा हट, भारतातील प्रचंड लोकप्रिय आणि विश्वासार्ह पिझ्झा ब्रँड 10 नवीन पिझ्झाचे विविध प्रकार लाँच करत आहे.

saif ali khan and shehnaz gill attend launch of 10 new pizzas for every mood by pizza hut | प्रत्येक मूडनुसार 10 नवीन पिझ्झा लाँच करण्याकरिता ‘पिझ्झा हट’मध्ये सैफ अली खान आणि शहनाज गिल यांचा सहभाग

प्रत्येक मूडनुसार 10 नवीन पिझ्झा लाँच करण्याकरिता ‘पिझ्झा हट’मध्ये सैफ अली खान आणि शहनाज गिल यांचा सहभाग

googlenewsNext

पिझ्झा हट, भारतातील प्रचंड लोकप्रिय आणि विश्वासार्ह पिझ्झा ब्रँड 10 नवीन पिझ्झाचे विविध प्रकार लाँच करत असून ते ग्राहकांच्या प्रत्येक संभाव्य मूडशी जुळणारे आहेत. एका रोमांचक मसालेदार किकचा शोध असो किंवा त्यांना हवासा वाटणारा चपखल आराम असो, पिझ्झा हट ग्राहकांसाठी अप्रतिम चवीचे पिझ्झा घेऊन दाखल झाली आहे, ज्यामुळे केवळ त्यांच्या जिभेचे चोचले पूर्ण होणार नाही तर खवय्यांचा मूड देखील संतुष्ट करेल. ब्रँडने ‘मूड बदले, पिझ्झा बदले’ मोहिमेद्वारे या श्रेणीला प्रोत्साहन देण्यासाठी मेगास्टार सैफ अली खान आणि शहनाज गिल यांना सामील करून घेतले आहे. ही मोहीम आपल्या सतत बदलत राहणाऱ्या मूडवर लक्ष केंद्रित करते आणि त्यासोबतच आपली खाण्याची इच्छा देखील बदलते. नवीन श्रेणी भारतातील सर्व 800 पिझ्झा हट स्टोअर्समध्ये डाईन-इन, डिलिव्हरी आणि टेकअवेमध्ये उपलब्ध असेल.ज्याच्या किंमती दोन पर्सनल पिझ्झासाठी रु. 299 पासून सुरू होतील.

पिझ्झा हटच्या नवीन रेंजमध्ये मजेदार माखनी पनीर, धाबे दा किमा, चीझी मशरूम मॅजिक, मेक्सिकन फिएस्टा, अप्रतिम अमेरिकन चीझी आणि नवाबी मुर्ग माखनी यांसारख्या 10 रोमांचक आणि अद्वितीय फ्लेवर्सचा समावेश आहे. मुबलक टॉपिंग्सने भरलेले, मिंट मेयो आणि टेक्सास गार्लिक यांसारख्या अत्यंत आवडत्या ग्लोकल फ्लेवर्समध्ये खास तयार केलेल्या सॉससह पिझ्झा आणखी आनंददायी आणि भूक शांत करणारे असल्याने त्यांना कायम पसंती देण्यात येईल. ब्रँडने भारतीयांना आकर्षित करण्यासाठी माखनी सॉस सादर केला आहे. श्रेणीचे सर्व फ्लेवर विशेषतः पिझ्झाला उत्कंठावर्धक बनवण्यासाठी तयार करण्यात आले आहेत - मग मजेदार माखनी पनीरच्या बेसवर वापरलेला बटरी माखनी सॉस असो किंवा चीझी मशरूम मॅजिकचा क्रीमी, ओघळणारा आणि चीझी बेस सॉस आणि त्यासोबत निराळ्या चवीचे मशरूम आणि ऑलिव्ह स्वाद असो.

लाँचबद्दल बोलताना पिझ्झा हट इंडियाच्या चीफ मार्केटिंग ऑफिसर आनंदिता दत्ता म्हणाल्या, “आपला मूड कोणत्या अन्नाची भूक आहे हे ठरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो आणि आम्हाला ग्राहकांना त्यांच्या विविध मूडसाठी वेगवेगळे पर्याय द्यायचे होते. 10 नवीन पिझ्झाची विस्तृत श्रेणी लाँच करण्यामागे आमची हीच प्रेरणा होती, ज्यामध्ये प्रथमच अनेक चवदार पदार्थांचा समावेश करण्यात आला. आमच्याकडे आता प्रत्येकासाठी काही ना काही आहे, ज्यामध्ये परिचित आणि दिलासादायक ते बोल्ड आणि रोमांचक फ्लेवर्स आहेत. आम्हाला खात्री आहे की, ग्राहकांकरिता सादर करण्यात आलेले विविध प्रकार त्यांना आवडतील आणि पिझ्झा हट पिझ्झासह कधीही, कोणत्याही दिवशी त्यांचा मूड एक पाऊल पुढे जाईल.” 

प्रत्येक टचपॉईंटवर ग्राहकांशी कनेक्ट होण्यासाठी, पिझ्झा हट मोठ्या प्रमाणात 360-डिग्री “मूड बदले, पिझ्झा बदले” मार्केटिंग मोहीम संपूर्ण टेलिव्हिजन, डिजिटल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, पीआर आणि एनफ्लूएन्सर आउटरीच, OOH आणि इन-स्टोअर ब्रँडिंगवर आणणार आहे. हा ब्रँड दोन स्वतंत्र TVC लाँच करत असून त्यात सैफ अली खान आणि शहनाज गिल एका पिझ्झा हट रेस्टॉरंटमध्ये बसलेले आहेत आणि त्यांच्या बदलत्या मूडनुसार सर्व्हरकडून परिपूर्ण पिझ्झा पर्याय जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, जसे की सैफसाठी नवाबी मुर्ग माखनी.. कारण तो प्रत्येक वेळी पिझ्झा हटला भेट देतो तेव्हा त्याला राजा असल्यासारखं वाटतं. तसंच शहनाजच्या नॉट-सो-हॅप्पी मूडसाठी क्रीमी मशरूम आहे. Links : bit.ly/3N4nhA9 & bit.ly/3V58qar

पिझ्झा हट’ने भारतात आपलं 800 वे स्टोअर उघडून 199 हून अधिक नवीन शहरांमध्ये त्याची उपस्थिती वाढवून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. ब्रँड त्याच्या ठळक नवीन ब्रँड प्लॅटफॉर्मसह सुरू आहे, ‘दिल खोल के डिलिव्हरिंग’ जे दररोज ताज्या कणकेने बनवलेल्या स्वादिष्ट, ताज्या आणि समाधानकारक पिझ्झाचं वचन देते. पिझ्झा हटच्या उबदार आणि मैत्रीपूर्ण ग्राहक सेवेत, एक सोपा, गुंतागुंत-मुक्त ऑर्डरिंग अनुभव आणि ‘ट्रस्ट इन एव्हरी बाईट’ची हमी, दिल सॅटीसफाईंग व्हॅल्यू दिली जाते.

Web Title: saif ali khan and shehnaz gill attend launch of 10 new pizzas for every mood by pizza hut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न