पराठ्याचे हे पाच प्रकार करून बघा! तुमचा पराठा लक्षात राहिलाच म्हणून समजा!

By admin | Published: May 23, 2017 06:36 PM2017-05-23T18:36:25+5:302017-05-23T18:36:25+5:30

त्याच त्याच प्रकारचे पराठे खाऊन कंटाळा आला असेल तर काहीतरी वेगळं करून पाहा की ! पराठा टेम्पटिंग करण्याचे पाच पर्याय आहेत. यातला कोणताही पर्याय ट्राय करा

See these five types of parathas! Please remember your strength! | पराठ्याचे हे पाच प्रकार करून बघा! तुमचा पराठा लक्षात राहिलाच म्हणून समजा!

पराठ्याचे हे पाच प्रकार करून बघा! तुमचा पराठा लक्षात राहिलाच म्हणून समजा!

Next

 

-सारिका पूरकर-

 

पराठा. भारतीय खाद्यसंस्कृतीतील एक अतिशय चवदार व पोटभरीचा पदार्थ. नाश्त्यासाठी तर सर्वात बेस्ट आॅप्शन समजला जातो. एवढेच नाही तर प्रवासातील खाणं म्हणूनही यास दुसरा पर्याय नाही. पराठा घराघरात चवीचवीनं खाल्ला जातो. इंदोर, लखनौ, दिल्ली येथे तर पराठेवाली गली म्हणून खाऊगल्ली प्रसिद्ध आहे. पंजाबी खाद्यपदार्थांच्या वंशावळीतील हा पदार्थ आता भारतभर खाल्ला जातो. जिरे-ओव्याचा, बटाटा, पालक, मेथी, कोबी, दुधी, बीटरुटचा पराठा अशा अनेक प्रकारे पराठे करता येतात. पराठ्याचा हा प्रत्येक प्रकार प्रत्येकाच्या घरी करून झालेला असेल. त्याच त्याच प्रकारचे पराठे खाऊन कंटाळा आला असेल तर काहीतरी वेगळं करून पाहा की ! पराठा टेम्पटिंग करण्याचे पाच पर्याय आहेत. यातला कोणताही पर्याय ट्राय करा. तुमचा पराठा हिट झालाच म्हणून समजा!

१) चॉकलेट पराठा

नाव काढल्याबरोबर तोंडाला पाणी सुटलं असेल! सुटणारच. कारण चॉकलेट हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचं. शिवाय केक, आईस्क्रिममध्येही हाच फ्लेवर बहुतेकजण आवडीनं खातात. मग पराठ्यातच का नको हा फ्लेवर ! चॉकलेट पराठा हा तसा मुंबईच्या स्ट्रीट फूडपैकी एक प्रकार. पण आपल्याला हा पराठा घरीही बनवता येतो. अजिबात अवघड नाहीये. यासाठी बाजारातून चोको चिप्स घेऊन या. परातीत कणिक घ्या. त्यात चवीला मीठ, तूप घाला. हातानं चांगल्ं चोळून घ्या. नंतर यात पाणी घालून कणिक मऊसर मळून घ्या. १० मिनिटांनी या कणकेचे गोळे करुन मध्यम आकाराच्या आणि जाडीच्या पोळ्या लाटून घ्या. आता पोळपाटावर एक पोळी ठेवून त्यावर चोको चिप्स पसरवा. लगेच वरुन दुसरी पोळी पसरवून कडा दाबून बंद करुन टाका. हा पराठा तव्यावर तूप सोडून शेकून घ्या. चोको चिप्स विरघळून पराठ्याला छान फ्लेवर येतो. बच्चे कंपनी तर खुश होतीलच शिवाय मोठेही आवडीने खातील. मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठीही मस्त पर्याय आहे.

 

      

३) फरसाण पराठा

बाऊलमध्ये फरसाण कुस्करुन घ्या. यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, तिखट, गरम मसाला, चाट मसाला घालून सारण तयार करा.आवडत असल्यास चिंचेचा कोळ घालून या सारणाला आंबटगोड चव आणू शकता. हे सारण भरुन नेहमीप्रमाणे पराठे लाटा आणि शेकून घ्या. पराठ्याला चटपटीत चव येते. नायलॉन शेव वापरुनही हा पराठा बनवता येतो.

४) खजुराचा पराठा

पराठा मुळातच पौष्टिक असतोच, मात्र या पौष्टिकेत आणखी भर घालायची असेल तर हा पराठा करायलाच हवा. खुजरातील बिया काढून टाका. तुकडे करुन घ्या. मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप दूध आणि अर्धा कप खजुराचे तुकडे एकत्र करुन वाटून घ्या. तयार पेस्टमध्ये कणिक, मोहन म्हणून तूप, चवीला मीठ घालून कणिक मळून घ्या. तयार कणकेचे पराठे लाटून तूपावर शेकून घ्या. खुजराचा रंग, त्याचा चिकटपणा मुलांना आवडत नाही, म्हणून खजूर खायला ते नाक मुरडतात. हा पराठा मात्र मुलांना खजूर खाऊ घालण्यासाठीचा उत्तम पर्याय आहे. याचप्रकारे पिकलेली केळी कुस्करुन त्यात मावेल तेवढी कणिक मळून पराठे करता येतात.

५) मूंग मोगर पराठा

राजस्थानी, मारवाडी बांधवांचा हा खूप लोकप्रिय पराठा. करायला सोपा आणि चवीला पौष्टिकही. यासाठी मूग डाळ चार ते पाच तास भिजत घालावी. नंतर पूर्ण निथळून घ्यावी. मिक्सरमधून खरबरीत वाटून घ्यावी. परातीत कणिक, मीठ, हिंग, हळद-तिखट, मोहन म्हणून तेल, आवडत असल्यास जिरे आणि वाटलेली मूग दाळ घालून कणिक मळून घ्यावी. पराठे लाटून तेल सोडून खरपूस शेकून घ्यावी. शेकताना पराठा दाबून घेत चला, म्हणजे अर्धवट दळलेली डाळ छान खुसखुशीत होईल. हे पराठे पचायलाही हलके असतात.

Web Title: See these five types of parathas! Please remember your strength!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.