वाढत्या वयात मोड आलेले कडधान्य खाणं नुकसानकारक? जाणून घ्या सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 10:47 AM2019-06-20T10:47:14+5:302019-06-20T10:51:51+5:30
आरोग्यासंबंधी सतत चिंतेत राहणाऱ्या लोकांमध्ये अलिकडे मोड आलेलं कडधान्य चांगलेच लोकप्रिय होत आहेत.
आरोग्यासंबंधी सतत चिंतेत राहणाऱ्या लोकांमध्ये अलिकडे मोड आलेलं कडधान्य चांगलेच लोकप्रिय होत आहेत. लोक आजारांपासून वाचण्यासाठी आणि नेहमी फिट राहण्यासाठी एक चांगला पर्याय म्हणून कडधान्यांना पसंती मिळत आहे. काही लोकांचं असं मत आहे की, मोड आलेले कडधान्य आरोग्यवर्धक आणि इतर पर्यायांच्या तुलनेत अधिक पौष्टिकही आहेत. असेही मानले जाते की, मोड आलेल्या कडधान्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहते.
जर तुम्ही खाण्यासाठी कडधान्य अंकुरित करत असाल तर ते केवळ तोपर्यंत अंकुरित होऊ द्या जोपर्यंत धान्य स्वत: अंकुरित होत नाहीत. जर मोड अधिक वाढू दिले तर ते धान्यातील पोषक तत्त्वांचा वापर करून पोषक तत्व कमी करतात.
मोड आलेल्या धान्याचे पोषक तत्त्व
मोड आलेल्या कडधान्यात फायबर, व्हिटॅमिन, खनिज, अॅंटी-ऑक्सिडेंट्ससारखे बायोअॅक्टिव तत्व असतात आणि मोड आलेल्या कडधान्याचे सेवन करून तुम्ही हे पौष्टिक तत्व मिळवू शकता. यात कॅलरी, चरबी आणि सोडियम सुद्धा कमी असतं.
रिसर्च काय सांगतो?
मोड आलेल्या धान्यातील कार्बोहायड्रेट शुगरमध्ये रूपांतरित होतात, तर प्रोटीन अमीनो अॅसिडमध्ये बदलतात. तसेच चरबी फॅटी अॅसिडमध्ये बदलतं. या बदलामुळे शरीरासाठी पोषक तत्त्वांना शोषूण घेणं सोपं होतं. १९४० मध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, मोड आलेल्या कडधान्यात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. २००१ मध्ये इंटरनॅशनल जर्नल ऑफ फूड सायन्स अॅन्ड न्यूट्रिशनला आढळलं की, कोरड्या धान्याच्या तुलनेत मोड आलेल्या कडधान्यात जास्त अॅंटी-ऑक्सिडेंट, व्हिटॅमिन सी आणि बीटा कॅरोटीन असतं.
२००८ मध्ये टाइप २ डायबिटीसमध्ये मोड आलेले पांढरे किंवा ब्राउन राइसवर एक रिसर्च करण्यात आला. या रिसर्चमधून असं आढळलं की, मोड आलेल्या तांदळाच्या सेवनामुळे ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते.
वृद्धावस्थेत मोड आलेले धान्य खाऊ शकता का?
होय...वृद्धावस्थेतही तुम्ही मोड आलेले धान्य खाऊ शकता. मोड आलेल्या धान्याचे पोषक तत्व लक्ष घेता असं म्हणता येईल की, हे वृद्ध लोकांसाठीही फायदेशीर आहेत. यात भरपूर प्रमाणात फायबर असतं, जे डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यास फायदेशीर असतं आणि पचनासही मदत होते. वृद्धावस्थेत अशाप्रकारच्या समस्या असणं सामान्य असतं. त्यामुळे वृद्ध लोकांसाठी मोड आलेले कडधान्य फायदेशीर ठरतात. धान्यातील अॅंटी-ऑक्सिडेंट्स शरीराला फ्री रॅडीकल्सपासून सुरक्षित राहण्यास मदत करू शकतात.