तरुणाईला ‘फूड पॉर्न’ दाखवा, जंक फूड खाणं ते विसरूनच जातील..
By Admin | Published: May 27, 2017 05:58 PM2017-05-27T17:58:54+5:302017-05-27T17:58:54+5:30
संशोधक म्हणतात, पिझ्झा, बर्गर, चिप्स, हॉट डॉग, सॅँडविच.. असलं अरबट-चरबट खाणं तरुणाई विसरूनच जाईल..
- मयूर पठाडे
रोज आपण काय खातो? पिझ्झा, बर्गर, सॅँडविच, बटाटावडा, फ्रेंच फ्राईज, चिप्स, हॉट डॉग... असलं बरंच काही.. घरच्या जेवणापेक्षा बऱ्याचदा अशाच गोष्टींचा मारा आपण पोटावर करत असतो. यानं आपलं पोट भरतं का?, नक्कीच भरतं, पण खरंच असल्या अरबट-चरबट, जंक फूड, फास्ट फूड खाण्याचा आपल्या शरीराला काही उपयोग होतो का? - नाहीच, पण त्याची चटकच अशी िलागते की त्यानं राहवतच नाही. शिवाय आपल्या आजूबाजूचे मित्रमैत्रिणी भूक लागल्यावर आणि नाही लागली तरी पोटभरीसाठी येताजाता हेच तोंडात टाकत असतात. त्याचीच मग क्रेझ होते.
पण ही सवय जर मोडायची असेल, आणि हेल्दी खाण्याची सवय जर आपल्याला लावायची असेल, तर काय केलं पाहिजे?
तुम्ही म्हणाला, हे अरबट चरबट खाणं तुम्ही आम्हाला सोडायला सांगाल..
सोशल साईटवर पडिक असणाऱ्या किंवा त्यावर रोज नित्यनेमानं फेरफटका मारणाऱ्या तरुणाईसमोर जर ‘फूड पॉर्न’ वारंवार पडलं तर त्यांच्याही आरोग्याच्या सवयी सुधरू शकतात. त्यासाठी आरोग्यदायी आहाराच्या आकर्षक इमेजेस म्हणजेच ‘फूड पॉर्न’ जर तरुणाईला वारंवार दाखवल्या गेल्या, तर आपली आगामी पिढी नक्कीच सुदृढ बनेल असा या संशोधकांना विश्वास आहे.
म्हणूनच कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचे हे संशोधक सांगतात, ‘फूड पॉर्न’च्या या टेम्टिंग इमेजेस तरुणाईला दाखवाच.. आणि मग बघा.. काय फरक पडतो ते!