जास्त टोमॅटो केचप खात असाल तर वेळीच व्हा सावध, होतात हे नुकसान!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 12:47 PM2019-03-15T12:47:47+5:302019-03-15T12:50:27+5:30
अलिकडे टोमॅटो केचप अनेकांच्या डाएटमधील महत्त्वाचा भाग झालं आहे. खासकरून जंक फूड खाण्याऱ्यांच्या.
अलिकडे टोमॅटो केचप अनेकांच्या डाएटमधील महत्त्वाचा भाग झालं आहे. खासकरून जंक फूड खाण्याऱ्यांच्या. लहान मुलांना तर याशिवाय घासही घशाखाली उतरत नाही. पास्ता असो, मॅगी असो, पराठा असो किंवा ऑमलेट प्रत्येक पदार्थासोबत टोमॅटो केचप लागतंच. पण तुम्हाला माहीत आहे का की, टोमॅटो केचप तुमच्या आरोग्यासाठी किती नुकसानकारक आहे?
जाडेपणा आणि डायबिटीजसारख्या समस्या
gwcaia.com वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, टोमॅटो सॉस किंवा केचपमध्ये केमिकल्ससोबतच प्रिजरवेटिव्हचाही वापर केला जातो. ज्यामुळे जाडेपणा आणि डायबिटीजचा धोका वाढतो. त्यामुळे चांगलं होईल की, घरीच तुम्ही फ्रेश सॉस तयार करून खावा. पण तोही तितकाच जितकी गरज आहे. पोळीसोबत भाजी म्हणून केचप अजिबात खाऊ नका. हे तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं.
आरोग्यासाठी चांगले नाहीत काही इनग्रेडीएंट
केचपमध्ये डिस्टिल्ड व्हेनेगर आणि फ्रक्टोज शुगरचा भरपूर प्रमाणात वापर केला जातो. त्यासोबतच रेग्युलर कॉर्न सीरप आणि ऑनियन पावडर सुद्धा असतं. हे जीएमओ कॉर्नने तयार केलेलं असतं. ज्यात केमिकल्स आणि पेस्टिसाइड्चा भरपूर प्रमाणात वापर होतो. त्यामुळे सॉस तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो.
नष्ट होतात पोषक तत्त्व
टोमॅटो केचप तयार तयार करण्यासाठी टोमॅटो आधी उकडून त्यातील सर्व बीया आणि त्याची त्वचा काढली जाते. त्यानंतर त्यांना पुन्हा उकडलं जातं. ही संपूर्ण प्रक्रिया होण्यासाठी काही तास लागतात. ज्यात टोमॅटोमधील सर्व पोषक तत्व नष्ट होतात.
किडनीवरही होतो प्रभाव
टोमॅटो केचपमध्ये ना प्रोटीन असतात आणि ना फायबर वा मिनरल्सही नसतात. उलट यात शुगर आणि सोडियम भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे किडनीवरही प्रभाव पडतो आणि डायबिटीजने पीडित लोकांसाठी सुद्धा हे अजिबात चांगलं नाही. यात शिजवलेलं लायकोपीन सुद्धा असतं, जे शरीर सहजपणे शोषून घेऊ शकत नाही. याने वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात.