पांढऱ्या तांदळाबाबत संशोधकांनी दिला इशारा; दररोज सेवन करणं ठरू शकतं घातक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 03:14 PM2019-01-18T15:14:15+5:302019-01-18T15:17:44+5:30
भारतातील लोकांचा आहार हा भाताशिवाय अपूर्णच आहे. अनेकजण आहारात फक्त भातच खातात, तर अनेकांचं जेवण भाताशिवाय पूर्णच होत नाही.
भारतातील लोकांचा आहार हा भाताशिवाय अपूर्णच आहे. अनेकजण आहारात फक्त भातच खातात, तर अनेकांचं जेवण भाताशिवाय पूर्णच होत नाही. अनेकदा आहारतज्ज्ञ थंडीमध्ये भात न खाण्याचा सल्ला देतात. परंतु भात हा एक असा पदार्थ आहे, जो प्रत्येक घरामध्ये दररोज तयार करण्यात येतो. खरं तर भातामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन्स, खनिजं आणि कार्बोहायड्रेट्स मुबलक प्रमाणात असतात. त्याचे शरीराला अनेक फायदेही आहेत. परंतु यामुळे शरीराला अनेक समस्यांचा सामनाही करावा लागतो. हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, ज्या व्यक्ती अधिक प्रमाणात पांढरा तांदूळ खातात. त्यांना टाइप-2 डायबिटीज होण्याचा धोका अधिक असतो.
अनेक संशोधनातून या गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे की, दररोज भात खाल्याने आर्सेनिकसारखे विषारी रसायन शरीरामध्ये प्रवेश करते. ज्यामुळे कॅन्सर, हृदय रोग आणि डायबिटीज यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. संशोधकांच्या मते, भातामध्ये दुसऱ्या गोष्टींच्या तुलनेत 10 ते 20 टक्के जास्त आर्सेनिक रसायन आढळून येतं. ज्यामुळे आरोग्याशी निगडीत अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
जर तुम्ही ब्राउन राइस खात असाल तर त्यामुळे तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम अजिबात दिसून येत नाहीत. अनेक लोक आपल्या दैनंदिन आहारामध्ये पांढऱ्या तांदळाचाच वापर करतात. जर तुम्हीही जास्त प्रमाणात भाताचे सेवन करत असाल तर त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जाणून घेऊया शरीराच्या अनेक समस्यांबाबत...
1. लठ्ठपणाचा वाढता धोका
जर तुम्ही नियमितपणे पांढऱ्या तांदळाचे सेवन करत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. तांदळामध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात. अशातच भात खाल्याने वजन वेगाने वाढते.
2. पोटाच्या समस्या
पोटाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी फायबर्सचे योगदान फार महत्त्वाचे असते. परंतु जर तुम्ही तांदूळ खात असाल तर त्यामुळे तुम्हाला पोटाच्या समस्या होऊ शकतात. तांदळामध्ये फायबर्स नसतात. ज्यामुळे पोटामध्ये पचनाशी निगडीत समस्यांचाही सामना करावा लागतो.
3. डायबिटीजचा धोका
डायबिटीज होण्याची अनेक कारणं असतात, परंतु जर तुम्ही दररोज आहारात तांदळाचा समावेश करत असाल तर त्यामुळे तुम्हालाही डायबिटीजचा धोका संभवतो. तांदळाचे सेवन केल्यामुळे शरीरामध्ये ग्लूकोजचे प्रमाण वाढते आणि रक्तातील साखरेची पातळीही वाढते.
4. हाडांसाठीही हानिकारक
तांदूळ हाडांच्या आरोग्यासाठीही हानिकारक ठरतात. पांढऱ्या तांदळामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण फार कमी असते. ज्यामुळे याचे सेवन केल्याने हाडांना नुकसान पोहोचते. परिणामी हाडं ठिसूळ होतात.