नेहमीच्या कढीने कंटाळले असाल तर ट्राय करा 'ही' खास काळ्या चण्यांची कढी, वाचा रेसिपी!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 01:15 PM2024-09-28T13:15:33+5:302024-09-28T13:16:35+5:30
Kala Chana Kadhi Recipe: काळ्या चण्यांची कढी फारच टेस्टी लागते आणि सोबतच हेल्दी सुद्धा असते. ही कढी कही आणि काळ्या चण्यांच्या मदतीने बनवली जाते.
Kala Chana Kadhi Recipe: भारतात हजारो प्रकारचे पदार्थ बनवले जातात. ज्यातील एक खास डिश म्हणजे सगळ्यांना आवडणारी चटपटीत कढी. वेगवेगळ्या भागांमध्ये कढी अनेकप्रकारे बनवली जाते. पण तुम्ही कधी काळ्या चण्यांची कढी सेवन केली का? कदाचित केली नसेल. काळ्या चण्यांची कढी फारच टेस्टी लागते आणि सोबतच हेल्दी सुद्धा असते. ही कढी कही आणि काळ्या चण्यांच्या मदतीने बनवली जाते. याची आंबट आणि मसालेदार टेस्ट तुम्हाला नक्कीच आवडेल. तुमची नेहमीची कढी सेवन करून तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही वेगळ्या पद्धतीची कढी तुम्ही ट्राय करू शकता. त्याचीच रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कढीसाठी लागणारे साहित्य
- भिजवलेले काळे चणे एक कप
- दही १ कप
- २ ते ३ चमचे बेसन
- बारीक कापलेली हिरवी मिरची
- थोडं किसलेलं आलं
- अर्धा चमचा हळद
- लाल मिरची पावडर अर्धा चमचा
- जिरे अर्धा चमचा
- २ ते ३ लवंग
- १ ते २ तेजपत्ता
- तेल २ ते ३ चमचे
- टेस्टनुसार मीठ
- कापलेली कोथिंबीर
काळ्या चण्यांची कढी बनवण्याची पद्धत
- काळ्या चण्यांची कढी बनवण्यासाठी सगळ्यात आधी चणे उकडून घ्या. यासाठी काळे चणे रात्रभर भिजवून ठेवा. नंतर ते प्रेशर कुकरमध्ये टाकून, त्यात थोडं मीठ टाकून ३ ते ४ शिट्या होऊ द्या.
- आता एका भांड्यामध्ये दही, बेसन, कापलेली मिरची, आलं, हळद, लाल तिखट आणि मीठ टाकून चांगलं मिश्रण करा. यात २ ते ३ कप पाणी टाकून चांगलं मिक्स करा.
- आता कढी तयार करण्यासाटी दही, चण्याचं मिश्रण कढईमध्ये टाका आणि मध्यम आसेवर ते शिजू द्या. हे चमच्याने फिरवत रहा, जेणेकरून दही फाटणार नाही. कढी कमीत कमी १० ते १५ मिनिटे उकडू द्या. कढी थोडी घट्ट होऊ द्या. गरज पडली तर थोडं पाणी टाका.
- दुसऱ्या बाजूला गॅसवर कढीसाठी तडका तयार करा. यासाठी कढईमध्ये तेल गरम करा. यात जिरे, लवंग आणि तेजपत्ता टाका. नंतर हे तेल कढीमध्ये टाकून चांगलं मिक्स करा.
- काळ्या चण्यांची कढी तयार आहे. यावर वरून तुम्ही कोथिंबीर टाकू शकता. ही कढी तुम्ही अशीही सेवन करू शकता किंवा भातासोबतही सेवन करू शकता.