अक्षय्य तृतीयेला बनवा खास मँगो शिरा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 08:15 PM2019-05-06T20:15:10+5:302019-05-06T20:19:40+5:30
आंब्याचा ऋतू असला की प्रत्येक पदार्थात आंबा घालण्याचा मोह होतो. त्यात अक्षय्य तृतीया असल्यावर तर आंबा तर खायलाच हवा. पण रस खायचा कंटाळा आला असेल तर ही खास मँगो शिऱ्याची रेसिपी तुमच्यासाठी.
पुणे : आंब्याचा ऋतू असला की प्रत्येक पदार्थात आंबा घालण्याचा मोह होतो. त्यात अक्षय्य तृतीया असल्यावर तर आंबा तर खायलाच हवा. पण रस खायचा कंटाळा आला असेल तर ही खास मँगो शिऱ्याची रेसिपी तुमच्यासाठी.
साहित्य :
- १ वाटी भाजलेला रवा
- २ वाट्या दुध
- १ वाटी पाणी
- दीड वाटी साखर
- अर्धी वाटी आमरस
- अर्धी वाटी साजुक तूप
- अर्धा चमचा केशर सिरप
- पाव चमचा वेलची पूड
- एक चमचा बदामाचे काप (आवडीनुसार)
कृती :
- एका भांड्यात दुध घेऊन ते गरम होण्यासाठी मध्यम आचेवर ठेवावे.
- कढईत तूप घेऊन त्यात भाजलेला रवा घ्यावा.
- कढई मध्यम आचेवर गरम करण्यास ठेवावी.
- रवा थोडासा तुपात भाजत रहावा.
- रवा छान सुगंध सुटेपर्यंत लालसर भाजून घ्या.
- रवा भाजल्यावर कढईत उकळेलेले गरम दुध ओतून ढवळून घ्यावे.
- झाकण ठेऊन एक ते दिड मिनटे रवा दुधात शिजू द्यावा.
- झाकण उघडून एकदा रवा नीट ढवळून घ्यावा.
- आता त्यात आमरस, साखर, वेलची पूड, केशर सिरप टाकून सर्व चांगले एकजीव करावे.
- झाकण ठेऊन २ ते ३ मिनटे शिजू द्यावा.
- आता झाकण काढून बदामाचे काप घाला आणि शिरा सर्व्ह करा.
- आवडत असल्यास सर्व करताना आंब्याच्या फोडी बारीक करून सजवू शकता.