रोजच्याच पालकच्या भाजीला कंटाळलायत?; पालक कोफ्ता ट्राय करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 06:42 PM2019-02-16T18:42:50+5:302019-02-16T18:44:18+5:30
पालकच्या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणावर आयर्न असतं. पालकच्या भाजीचे अनेक आरोग्यदायी फायदे असल्याचे आपण नेहमीच ऐकतो. अनेकदा डॉक्टर्सही पालकच्या भाजीचा आहारामध्ये समावेश करण्याचा सल्ला देत असतात.
पालकच्या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणावर आयर्न असतं. पालकच्या भाजीचे अनेक आरोग्यदायी फायदे असल्याचे आपण नेहमीच ऐकतो. अनेकदा डॉक्टर्सही पालकच्या भाजीचा आहारामध्ये समावेश करण्याचा सल्ला देत असतात. पण बऱ्याचदा एकाच पद्धतीने तयार केलेली भाजी खाऊन आपण कंटाळतो आणि त्या भाजीकडे दुर्लक्ष करतो. तुम्हीही पालकची भाजी खाऊन कंटाळला असाल तर आता पालकच्याच भाजीपासून तयार केली जाणारी एक हटके रेसिपी तुम्हाला सांगणार आहोत. ती तुम्ही ट्राय करू शकता.
अनेकदा मुलं पालेभाज्या खाण्याचा कंटाळा करतात. त्यावेळी त्यांना याच पालेभाज्यांपासून हटके पदार्थ करून खाऊ घालू शकता. तुम्ही पालक कोफ्ता ट्राय करू शकता. मुलं काय घरातील कोणीच कोफ्ता खाण्यापासून स्वतःला थांबवू शकणार नाही.
साहित्य :
कोफ्ता तयार करण्यासाठी साहित्य :
ब्रेड स्लाइस, किसलेलं पनीर, मैदा, उकडलेले मक्याचे दाणे, बेकिंग पावडर, हिरवी मिरची, कोथिंबीर, काळी मिरी पावडर, काजू, दही, मीठ चवीनुसार
ग्रेव्ही तयार करण्यासाठी :
पालक, हिरवी मिरची, आलं, तेल, धने पावडर, लाल मिरची पावडर, गरम मसाला, मीठ चवीनुसार
ग्रेव्हीची पेस्ट तयार करण्यासाठी :
कांदा बारिक चिरलेला, टोमॅटो बारिक चिरलेला, लवंग
फोडणीसाठी साहित्य :
तूप, आलं, कांदा बारीक चिरलेला
पालक कोफ्ता तयार करण्याची कृती :
- पालक कोफ्ता तयार करण्यासाठी ब्रेडच्या स्लाइस घेऊन त्यांच्या कडा काढून दह्यामध्ये भिजत ठेवा.
- 10 मिनिटांनंतर त्यामध्ये मैदा सोडून कोफ्त्यासाठी असलेलं सर्व साहित्य एकत्र करून व्यवस्थित एकत्र करा.
- मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्याला कोफ्त्याचा आकार द्या.
- तयार कोफ्ते मैद्यामध्ये घोळून कढईमध्ये सोनेरी होइपर्यंत डिप फ्राय करून घ्या.
- आता ग्रेवीची तयारी करा. त्यासाठी पालक, हिरवी मिरची, आलं आणि पाणी कुकरमध्ये ठेवून एक शीटी घेऊन शिजवून घ्या.
- थोडा वेळ थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारिक करून पेस्ट तयार करा.
- कढईमध्य तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्या.
- कांदा परतल्यानंतर त्यामध्ये टॉमेटोची पेस्ट एकत्र करून परतून घ्या.
- कोथिंबीर, लाल मिरची पावडर आणि मीठ एकत्र करून 2 मिनिटांसाठी शिजवून घ्या.
- त्यानंतर अर्धा कप पाणी कढईमध्ये घ्या आणि मंद आचेवर 6 ते 7 मिनिटांसाठी उकळून घ्या.
- त्यानंतर कोफ्ता ग्रेवीमध्ये एकत्र करा आणि उकळून घ्या.
- कोफ्ता तयार झाल्यानंतर फोडणीसाठीचं सर्व साहित्य एकत्र करून 2 मिनिटांसाठी एका पॅनमध्ये गरम करून घ्या. त्यानंतर ते कोफ्तावर पसरवून घ्या.
- तुमचा पालक कोफ्ता तयार आहे.