शरीराची ऊर्जा वाढविण्यासाठी 'या' पदार्थांचा आहारात समावेश करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 01:48 PM2018-10-31T13:48:52+5:302018-10-31T13:50:05+5:30

रोजच्या धावपळीमध्ये आपल्याला अचानक फार थकवा जाणवू लागतो. आपलं शरीर कमकुवत असेल तर आपण कोणतंही काम व्यवस्थित करू शकत नाही. दिवसभर थकवा आणि आळस जाणवतो.

stamina is getting less then add these superfoods in diet | शरीराची ऊर्जा वाढविण्यासाठी 'या' पदार्थांचा आहारात समावेश करा!

शरीराची ऊर्जा वाढविण्यासाठी 'या' पदार्थांचा आहारात समावेश करा!

Next

रोजच्या धावपळीमध्ये आपल्याला अचानक फार थकवा जाणवू लागतो. आपलं शरीर कमकुवत असेल तर आपण कोणतंही काम व्यवस्थित करू शकत नाही. दिवसभर थकवा आणि आळस जाणवतो. काही जण तर थोडसं काम करताच थकून जातात. असंच जर तुम्हाला वारंवार थकवा येत असेल तर त्यामागील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्या शरीरातील स्टॅमिना म्हणजेच ऊर्जा कमी होणं हे आहे. व्यायाम करताना तुम्हाला एक गोष्ट जाणवली असेल की, थोड्याशा वर्कआउटनेही तुम्हाला थकवा येतो. यामागेही तुमचा स्टॅमिना कारणीभूत असतो. पण गोंधळून जायची गरज नाही. तुम्ही तुमच्या आहारामध्ये थोडेसे बदल केले तर त्यामुळे तुम्ही स्टॅमिना वाढवू शकता. डाएटमध्ये स्टॅमिना वाढवणाऱ्या पदार्थांचा समावेश करा. जाणून घेऊया अशा पदार्थांबाबत ज्यांचा उपयोग शरीराची ऊर्जा वाढविण्यासाठी होतो. 

केळी

केळी फार पौष्टीक असतात. यामध्ये अनेक प्रकारची पोषक तत्व असतात. अॅन्टी-ऑक्सिडंट, पोटॅशिअम यांसारखे गुणधर्म मोठ्या प्रमाणावर असतात. शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, खेळाच्या मैदानामध्ये ब्रेकदरम्यान अनेक खेळाडू केळी खात असतात. त्यामुळे त्यांना खेळण्यासाठी ऊर्जा मिळण्यास मदत होते. वर्कआउटच्या आधी 30 मिनिटं केळी खा आणि त्यानंतर वर्कआउट करा. फायदा होईल. 

केल

केलमध्ये व्हिटॅमिन-सी, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, फोलेट अॅसिड, झिंक आणि आयर्न यांसारखी पोषक तत्व मोठ्या प्रमाणावर असतात. त्यासाठी केलचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यासही मदत होते. 

नारळाचे पाणी

नारळ पाण्यामध्ये व्हिटॅमिन-ई मुबलक प्रमाणात आढळतं. हे शरीर हायड्रेट करण्यासही फायदेशीर ठरतं त्याचप्रमाणे शरीरातील ऊर्जा वाढविण्यासाठीही यातील पोषक तत्वांचा उपयोग होतो. 

चिया सीड्स

शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी चिया सीड्स खाणं फायदेशीर ठरतं. वजन कमी करण्यासाठीच नाही तर स्टॅमिना वाढविण्यासाठीही चिया सीड्स लाभकारी ठरतात. यामुळे भरूपर ऊर्जा मिळते म्हणून वर्क आऊट करण्याआधी याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.

क्विनोआ

क्विनोआ एक ग्लूटन फ्री सुपरफूड आहे जे प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि अमीनो अॅसिड यांसारखी पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. नाश्त्यामध्ये याचं सेवन केल्याने दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. त्याचसोबत हे स्टॅमिना वाढविण्यासाठी फायदेशीर ठरते.

Web Title: stamina is getting less then add these superfoods in diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.