तणाव आणि चिंता दूर करण्याचा जपानी उपाय 'माचा' चहा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 10:54 AM2019-07-12T10:54:22+5:302019-07-12T10:57:47+5:30
चिंता आणि तणाव दूर करण्यासाठी वेगवेगळे उपाय सांगितले जातात. अशात आता जपानच्या माचा चहाची भर पडणार आहे.
(Image Credit : Gurunavi)
सध्या धावपळीच्या जीवनात अनेकांना वेगवेगळ्या कारणांनी तणावाचा सामना करावा लागतो. हाच तणाव पुढे जाऊन डिप्रेशनची जागा घेतो आणि समस्या अधिक वाढते. पण याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. तर यावर काहींना काय उपाय करावे हेच माहीत नसतं. तुम्हीही तणावाचे शिकार असाल तर चिंता सोडा, कारण आता तुमचा तणाव दूर करण्यासाठी आला आहे जपानी चहा 'माचा'. हा चहा तुमचा तणाव दूर करू शकतो असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.
जपानच्या कुमामोतो युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी नुकताच उंदरांवर प्रयोग केला. यातून त्यांना आढळलं की, ज्या उंदरांनी माचा पावडर किंवा माचा चहा सेवन केला, त्यांच्या चिंताजनक व्यवहारात घट बघायला मिळाली. अभ्यासकांनुसार, माचा चहामध्ये काही असे तत्त्व असतात जे चिंता आणि तणाव कमी करण्यास मदत करतात. हे तत्त्व डोपामीन डी १ रिसेपटर्स आणि सेरोटोनिन 5-HT1A रिसेप्टर्सना अॅक्टिवेट करतात. हे दोन्ही केमिकल चिंताजनक व्यवहाराशी संबंघित असतात.
(Image Credit : Bon Appetit)
रिसर्चचे मुख्य लेखक युकी यांच्यानुसार, यावर आणखी रिसर्च करण्याची गरज आहे. तेच आमच्या रिसर्चमधून हे सिद्ध होतं की, वर्षानुवर्षे औषधी म्हणून वापरलं जाणारं माचा मावनी शरीरासाठी फायदेशीर आहे. आशा करतो की, माचाबाबत केला गेलेला आमचा हा रिसर्च आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.
(Image Credit : falafelandcaviar.com)
या रिसर्चमध्ये उंदरांवर एंग्जायटी टेस्ट केली गेली. ज्यातून समोर आलं की, माचा पावडर किंवा माचाचा अर्क प्यायल्यानंतर चिंताजनक व्यवहार कमी होतो. यातून आणखी एक बाब समोर आली की, ज्या उंदरांनी माचाचा अर्क गरम पाण्यासोबत सेवन केला त्यांची चिंता आणि तणाव ८० टक्के कमी झाल्याचं आढळलं. माचा सावलीच्या ठिकाणी उगवली जाणारी एक कॅमिलिया सिनेन्सिस नावाचं चहाचं पावडर आहे.