प्रेशर कुकर वापरताना 'या' गोष्टींची घ्या काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 04:39 PM2018-07-20T16:39:50+5:302018-07-20T16:42:08+5:30

स्वयंपाक घरात प्रेशर कुकरचा वापर सर्रास होतो. अनेकदा तर इंधन बचतीसाठी प्रेशर कुकरचा वापर करण्याचा सल्ला देण्यात येतो. भाजी, डाळ, बटाटे उकडण्यासाठी, भात तयार करण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करण्यात येतो.

Take care of these things when using pressure cooker | प्रेशर कुकर वापरताना 'या' गोष्टींची घ्या काळजी!

प्रेशर कुकर वापरताना 'या' गोष्टींची घ्या काळजी!

googlenewsNext

स्वयंपाक घरात प्रेशर कुकरचा वापर सर्रास होतो. अनेकदा तर इंधन बचतीसाठी प्रेशर कुकरचा वापर करण्याचा सल्ला देण्यात येतो. भाजी, डाळ, बटाटे उकडण्यासाठी, भात तयार करण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करण्यात येतो. पण तुम्हाला माहीत आहे का, प्रेशर कुकरचा वापर नीट केला नाही तर जीवघेणा ठरू शकतो. आज आपण जाणून घेऊयात प्रेशर कुकर वापरण्याची योग्य पद्धत...

1. पाण्याशिवाय कुकरचा वापर करू नका.

कुकरचा वापर जास्तीत जास्त भाजी बनवण्यासाठी किंवा डाळ शिजवण्यासाठी करण्यात येतो. कुकरचा वापर करताना त्यामध्ये अशाच गोष्टी शिजवा ज्यांच्यामध्ये पाण्याची मात्रा अधिक असते. पाण्याशिवाय कुकरमध्ये काहीच शिजवू नका. कारण कुकरमध्ये पाणी नसेल तर त्यामध्ये वाफ जास्त प्रमाणात तयार होते. त्यामुळे कुकर फुटण्याचा धोका वाढतो. 

2. कुकर जबरदस्तीने उघडू नका

कुकरमध्ये ठेवलेला पदार्थ शिजल्यावर कुकर गॅसवरून उतरवून ठेवा. त्यानंतर कुकरचं झाकण उघडण्याची घाई करू नका. कुकर थंड होऊ द्या मग तो उघडा. त्यातील संपूर्ण वाफ निघून जाऊ द्या. जत तुम्ही कुकरला जबरदस्तीने उघडण्याचा प्रयत्न केला तर त्यातील वाफ तुमच्यावर येऊन तुम्हाला भाजू शकते. 

3. कुकरच्या आत असलेली रबराची रिंग तीन महिन्यांनी बदला

कुकरची रिंग प्रत्येक तीन महिन्यांनी अवश्य बदला. कारण जास्त वापरामुळे कुकरची रिंग झिजते. त्यामुळे कुकरमध्ये प्रेशर तयार होणं कमी होतं. आणि त्यातील पदार्थही योग्य प्रकारे शिजले जात नाहीत. त्याचबरोबर कुकरच्या फुटण्याचा धोकाही वाढतो. त्यामुळे कुकरची रिंग दर तीन महिन्यांनी अवश्य बदला.

4. कुकर स्वच्छ ठेवा

कुकरचा वापर रोज होत असल्यानं त्याला साफ ठेवणं गरजेचं असतं. खासकरून कुकरची शिटी नीट स्वच्छ करा. नाहीतर त्यामध्ये काहीतरी अडकले तर कुकर फुटण्याचा धोका संभवतो. 

Web Title: Take care of these things when using pressure cooker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.