तरतरी आणणारा तंदुरी चहा; 'असा' करून पहा!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 02:27 PM2019-02-05T14:27:19+5:302019-02-05T14:30:16+5:30
थंडीमध्ये चहा पिण्याची मजा काही औरच... पण अनेकांचा चहा हा जीव असतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दिवसाची सुरुवात अगदी प्रसन्नतेने करण्यासाठी चहा फार उपयोगी असतो. हुडहुडी भरवणारी थंडी..हातामध्ये कप आणि त्यामध्ये गरम वाफळणारा चहा...
थंडीमध्ये चहा पिण्याची मजा काही औरच... पण अनेकांचा चहा हा जीव असतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दिवसाची सुरुवात अगदी प्रसन्नतेने करण्यासाठी चहा फार उपयोगी असतो. हुडहुडी भरवणारी थंडी..हातामध्ये कप आणि त्यामध्ये गरम वाफळणारा चहा... जीवन अगदी सार्थकी लागल्यासारखेच वाटते. देशाच्या कानाकोपऱ्यातही वेगवेगळ्या प्रकारचे चहा मिळतात. तसेच सध्याच्या बदलणाऱ्या काळानुसार, प्रत्येक गोष्टीप्रमाणेच चहामध्येही वेगवेगळे एक्सपरिमेंट्स होत असलेले दिसतात. मसाला चहा, वेगवेगळ्या फ्लेवर्सचा चहा एवढचं नव्हे तर इतर देशांमधील ट्रेन्ड इथे फॉलो होताना दिसतात. या दिवसांमध्ये तंदूरी चहा फार चर्चेत आहे.
सध्या तंदूरी चहाची क्रेझ वाढतं असून अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि कॅफे या चहामध्ये वेगवेगळ्या एक्सपरिमेंट्स करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही कधी या चहाचा आस्वाद घेतला आहे का? किंवा तुम्हाला माहीत आहे का हा हटके चहा कसा तयार केला जातो? जाणून घेऊया तंदूरी चहाबाबत...
कसा तयार होतो तंदूरी चहा?
सर्वात आधी चहा साधारम पद्धतीने तयार करण्यात येतो. त्यानंतर चहा एका हॉट कंटेनरमध्ये किंवा अशा एखाद्या भांड्यामध्ये ठेवण्यात येतो. जेथे तो गरम राहिल. तंदूरी चहा तयार करण्यासाठी तंदूरमध्ये मातीचे छोटे छोटे कप गरम करण्यात येतात. कारण जेव्हा उकळणार चहा त्या गरम कपांमध्ये ओतला जाईल त्यावेळी त्या मातीचा स्वादही त्या चहामध्ये उतरेल. चवीला अत्यंत वेगळा असणारा हा चहा सर्वांना फार आवडतो. सध्या या चहाला बाजारातही खूप मागणी आहे.
घरीही सहज तयार करू शकता
सर्वात पहिल्यांदा मातीचं भांड 10 मिनिटांसाठी गरम करत ठेवा. आता त्यामध्ये पाणी उकळून घ्या आणि त्यामध्ये साखर, चहा पावडर, पुदीन्याची पानं, गवती चहा आणि चहा मसाला टाकून उकळून घ्या. जेव्हा हे व्यवस्थित उकळलं जाइल तेव्हा त्यामध्य दूध टाकून काही वेळासाठी शिजवून घ्या. आता चहा एका भांड्यामध्ये गाळून मातीच्या भांड्यामध्ये ओतून गरमा-गरम चहाचा आस्वाद घ्या.