कांदा आणि लसणाची झणझणीत टेस्टी चटणी, एकदा खाल खातच रहाल; जाणून घ्या रेसिपी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 11:38 AM2024-11-11T11:38:05+5:302024-11-11T11:39:13+5:30

ही झणझणीत आणि चटकदार चटणी तुम्ही एकदा खाल तर खातच रहाल. चला तर जाणून घेऊ कांदा आणि लसणाची ही खास चटणी कशी बनवाल.

Tasty and spicy garlic onion chutney, know how to make it | कांदा आणि लसणाची झणझणीत टेस्टी चटणी, एकदा खाल खातच रहाल; जाणून घ्या रेसिपी!

कांदा आणि लसणाची झणझणीत टेस्टी चटणी, एकदा खाल खातच रहाल; जाणून घ्या रेसिपी!

Spicy Onion-Garlic Chutney: जेवणासोबत तोंडी लावायला जर चटपटीत चटणी असेल तर जेवणाची टेस्ट दुप्पट होते. भारतीय जेवणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चटणींना महत्वाचं स्थान असतं. लोक हिरव्या मिरच्या, टोमॅटो, कैरी, पेरू, आवळा, लसूण, पदीना अशा वेगवगळ्या चटणींचं सेवन करतात. जर तुम्हाला वेगवेगळ्या चटणी खाणं आवडत असेल तर आम्ही तुमच्यासाठी एका खास चटणीची रेसिपी घेऊन आलो आहोत. ही झणझणीत आणि चटकदार चटणी तुम्ही एकदा खाल तर खातच रहाल. चला तर जाणून घेऊ कांदा आणि लसणाची ही खास चटणी कशी बनवाल.

कांदा-लसणाची चटणी

सगळ्यात आधी लसूण आणि कांद्याची साल काढून कापून घ्या. मसाला करायला सुरूवात करा. आधी एका पॅनमध्ये धणे, मेथीचे दाणे, जिरे, बडीशेप भाजून घ्या. जवळपास दोन मिनिटांनी यात थोडा हींग टाका. त्यालाही चांगलं मिक्स करा. आता गॅस बंद करा आणि मसाला थंड होऊ द्या.

हा मसाला थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक करा. आता एका पॅनमध्ये तुमच्या आवडीनुसार तेल टाका. तेल गरम झालं की, त्यात लसूण आणि कांदा टाका. कमी आसेवर दोन्ही गोष्टी चांगल्या होऊ द्या. वाळलेली लाल मिरचीही त्यात टाका आणि थंड झाल्यावर या गोष्टी बारीक करा. 

नंतर एक पॅन घ्या, त्यात थोडं तेल टाका. त्यात काही मोहरी आणि कलौंजीच्या बीया टाकून भाजा. या तडक्यामध्ये कांदा आणि लसणाची पेस्ट टाका. वरून लाल मिरची पावडर, टेस्टनुसार मीठ, जो मसाला तयार केला तो यात मिक्स करा. हे सगळं ३ ते ४ मिनिटे कमी आसेवर होऊ द्या. गॅस बंद आणि चटणी एका बाउलमध्ये काढा. ही चटणी तुम्ही वर्षभर एअरटाईट डब्यात स्टोर करू शकता. ही चटणी तुम्ही पराठे, चपाती, भात कशासोबतही खाऊ शकता.

Web Title: Tasty and spicy garlic onion chutney, know how to make it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.