टेस्टी मटार- कॉर्न कटलेट, बनतील घरातल्या प्रत्येकाचे फेव्हरेट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 08:39 PM2020-01-31T20:39:09+5:302020-01-31T20:49:12+5:30
पौष्टिक आणि चवदार पर्याय म्हणून हे कटलेट आवर्जून ट्राय करा. अगदी एक दिवस आधी टिक्की करून ठेवली तरी ताजे कटलेट करणे शक्य आहे.
सध्या हिवाळ्याचे दिवस सुरु आहेत. अशावेळी ताजे मटार, मक्याचे दाणे (स्वीटकॉर्न) बाजारात आले आहेत. त्यामुळे पौष्टिक आणि चवदार पर्याय म्हणून हे कटलेट आवर्जून ट्राय करा. अगदी एक दिवस आधी टिक्की करून ठेवली तरी ताजे कटलेट करणे शक्य आहे. त्यामुळे कमीत कमी वेळात होणारे हे कटलेट नक्की बनवून बघा.
साहित्य :
- एक वाटी मटार
- एक वाटी मक्याचे दाणे
- एक मोठा उकडलेला बटाटा
- एक अर्धी वाटी भिजवलेले पोहे
- आलं, लसूण, मिरची
- कोथिंबीर
- मीठ
- रवा
- तेल
कृती :
- मटार आणि मक्याचे दाणे उकळत्या पाण्यात घालून ठेवा आणि ५ मिनिटात निथळून घ्या.
- ते दाणे एकत्र करून मिक्सरला फिरवून वाटा. फार बारीक करू नयेत.
- आता परातीत मटार, कॉर्न, उकडलेला बटाटा,या आलं लसूण मिरची, भिजवलेले पो,े मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर एकजीव करून घ्या.
- आता तयार मिश्रणाचे चपटे गोल करून घ्या.
- हे गोळे रव्यात घोळवून दोन्ही बाजूने शॅलो फ्राय करून घ्या.
- सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.