खास पध्दतीची मसालेदार चविष्ट भरलेली वांगी, न खाणारेही आवडीने खातील...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 10:54 AM2019-11-25T10:54:39+5:302019-11-25T10:54:48+5:30

वांग किंवा वांग्याची भा़जी सगळ्याच्या घरात होत असते. कोणालाही साधी सोपी तयार केलेली वाग्यांची भाजी फारशी आवडत नसते.

Tasty, spicy stuffed brinjal masala | खास पध्दतीची मसालेदार चविष्ट भरलेली वांगी, न खाणारेही आवडीने खातील...

खास पध्दतीची मसालेदार चविष्ट भरलेली वांगी, न खाणारेही आवडीने खातील...

Next

(Image credit-memaharashtrian)

वांगी  किंवा वांग्याची भाजी सगळ्याच्या घरात होत असते. कोणालाही साधी सोपी तयार केलेली वाग्यांची भाजी फारशी आवडत नसते. पण तेच जर  भरलेली वांगी असेल तर घरातील लोकं आवडीने ते खातात. चला तर मग जाणून घेऊया, कशी तयार कराल झटपट चविष्ट भरलेली वांगी. 

(Image credit-curryfix.com)

साहित्य
अर्धा किलो जांभळी बिनबियांची वांगी (मसाला भरतो तशी चिरून घ्या), ४ कांदे (गॅसवर डायरेक्ट भाजून घ्या), अर्धी वाटी दाण्याचं कूट, अर्धी वाटी तिळाचं कूट, ८-१० लसूण पाकळ्या, बोराएवढा गूळ, १ टेबलस्पून काळा मसाला, १ टीस्पून लाल तिखट, पाव टीस्पून हळद, चिमूटभर हिंग, मीठ चवीनुसार, २ टेबलस्पून तेल, थोडीशी मोहरी.

(Image credit-pintrest)

(Image credit-Femina.in)

मसाल्याची कृती:

१) भाजलेले कांदे, लसूण मिक्सरमधे फिरवून बारीक वाटून घ्या.
२) नंतर त्यात दाण्याचं कूट, तिळाचं कूट, काळा मसाला, तिखट, हळद, मीठ आणि गूळ घालून मिक्सर अगदी एकदाच फिरवा.
३) दाण्याचं, तिळाचं कूट जास्त बारीक करायचं नाहीये. वांग्यात भरण्याचा मसाला तयार आहे.


(Image credit -recipestrack.blogspot)

भाजीची कृती:

१) प्रथम वांग्यांमधे तयार मसाला भरून तयार ठेवा.
२) एका नॉनस्टिक कढईत तेल चांगलं गरम करा. गरम झालं की त्यात मोहरी घालून तडतडू द्या.
३) आता त्यात हिंग घाला. नंतर त्यात भरलेली वांगी घाला. चांगलं हलवून घ्या.
४) अगदी मंद आचेवर झाकण ठेवून वांगी अगदी मऊ होईपर्यंत वांगी शिजवा. भरली वांगी तयार आहेत.

(Image credit-youtube)

एवढी भाजी ४-५ जणांना पुरते. आवडत असल्यास १ टेबलस्पून चिंचेचा कोळ घाला. गूळ नाही घातला तरी चालू शकेल. आवडत असल्यास तयार मसाल्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. बिनबियांची वांगी मिळाली नाहीत तर साधी काटेरी वांगीही चालतील.
या भाजीबरोबर गरम भाकरी, ठेचा उत्तम लागेल.


सौजन्य- (sayalirajadhyaksha)
 

Web Title: Tasty, spicy stuffed brinjal masala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.