Mango: हाताचा आंब्याचा वास संध्याकाळपर्यंत हाेता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 12:44 PM2022-04-10T12:44:48+5:302022-04-10T12:45:29+5:30

Mango: मागच्या लेखात नाटकाच्या दौऱ्यावरच्या पहिल्या जेवणाची कथा तुम्हाला सांगितली. पुढे तो दौराही अत्यंत वाईट प्रयोग आणि दारुण अवस्था यात पार पडला. त्यानंतर परत एकदा कोकणात प्रयोग लागले. माझ्या गावी रत्नागिरीला प्रयोग होता, म्हणून घरी गेलो.

The smell of mango on the hands till evening | Mango: हाताचा आंब्याचा वास संध्याकाळपर्यंत हाेता

Mango: हाताचा आंब्याचा वास संध्याकाळपर्यंत हाेता

Next

- संजय मोने, अभिनेते
मागच्या लेखात नाटकाच्या दौऱ्यावरच्या पहिल्या जेवणाची कथा तुम्हाला सांगितली. पुढे तो दौराही अत्यंत वाईट प्रयोग आणि दारुण अवस्था यात पार पडला. त्यानंतर परत एकदा कोकणात प्रयोग लागले. माझ्या गावी रत्नागिरीला प्रयोग होता, म्हणून घरी गेलो. लहानपणी दरवर्षी गावाला जात होतो. माझ्या आईने आमचे सगळे नातेसंबंध जपून ठेवले होते. वडिलांना अमुक एक भाऊ किंवा बहीण आणि इतर नाती असावीत, असा अंदाज असायचा. त्यामुळे कधीतरी ‘अहो! आत्ते नाही मामेभाऊ आहे तुमचा. नाव अशोक नाही सदानंद आहे’, असा आईचा आवाज कानावर पडायचा. त्यावर ‘तोच तो!’, असं बाबा म्हणायचे. आजही तीच परंपरा मी चालवली आहे आणि माझी पत्नी तशीच सुधारणा करत असते. असो! 
तर रत्नागिरीला प्रयोग होता. मी गावाला गेलो होतो. आता माझी आई हयात नाही; पण माझ्या सगळ्या काकू ती उणीव जाणवू देत नाही. मोठी काकू (तिचे नाव सुधा होते) होती, त्यानंतर शोभाकाकू मग रोहिणीकाकू आणि अनघाकाकू. सगळ्यांचा स्वयंपाक जणू माझ्या आईच्या धाकट्या बहिणी असल्यासारखा उत्कृष्ट आणि एकसाची होता. मी जरा ब्राम्हणी आमटीच्या बाबतीत फारच चिकित्सक आहे; पण सगळ्या काकूसारखी (झेरॉक्स) आमटी करायच्या. दोन दिवस प्रयोग सांभाळून घरचं जेवण झालं. उन्हाळा असल्यामुळे आमरस, घरचा भात, आंबोशीचं लोणचं (हे खायला कोकणातला जन्म असायला लागतो) खाऊन शेवटच्या दिवशी रत्नागिरी शहरात प्रयोगाला पोचलो. नेहमीप्रमाणे उकाड्याने जीव हैराण झाला होता. प्रयोग संपला आणि जेवायला दत्त नावाच्या कार्यालयात पोचलो. साधारण दीड-दोन वाजले होते. प्रयोग संपवून घरी परत जायचे होते. म्हणून जे काय असेल ते पोटात ढकलायचं आणि निघायचं एवढं ठरलं होतं. पानं मांडली गेली आणि काय आश्चर्य! ताटात स्वर्ग! उत्तम पडवळ डाळिंब्यांची उसळ, मऊसूत पोळ्या, पंचामृत, टोमॅटोचा रस्सा ताक आणि फणसाच्या बियांची (आठळ्या म्हणतात त्याला.) भाजी.. मस्त शिजलेल्या आठळ्या. साधी फोडणी, साधा गोडा मसाला. वर ओलं खोबरं.. इतकं सुंदर जेवण की, ते उत्तम भटजी नावाचे दत्त उपाहारगृहाचे चालक म्हणाले, ‘अहो! हापूसचा रस आहे माझ्या दारचा तोही खाऊन बघा!’ 
मी त्यांना म्हणालो ‘उत्तम भटजी! माझ्या घरचा आलोय की खाऊन’. ते ही कोकणातले खट, म्हणाले; ‘प्रत्येक आंब्याचे पान निराळे आणि रसही निराळा’, आग्रहाखातर फक्त चार वाट्या रस प्यायलो. पुढे आठवतं ते इतकंच, मुंबईत सात वाजता आलो. हाताला येणारा आंब्याचा वास संध्याकाळीही दरवळत होता.

Web Title: The smell of mango on the hands till evening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.