कबाब आणि वडापावची गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 11:34 AM2023-01-06T11:34:34+5:302023-01-06T11:35:15+5:30

आर्थिक चणचण असते तेव्हा उपलब्ध मोजक्या साधनसामुग्रीमध्ये चवदार पदार्थ, झटपट करण्याचा प्रयत्न असतो.

The thing about kebabs and vadapav! | कबाब आणि वडापावची गोष्ट!

कबाब आणि वडापावची गोष्ट!

googlenewsNext

- शुभा प्रभू साटम (खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक)

समाजातल्या बदलांचं एक महत्त्वाचं कारण स्थलांतर. बदलत्या काळामागे धावता-धावता पोटापाण्यासाठी लोक आपलं गाव, आपला देश सोडून दूरदेशी गेली. त्यांचा देश दूर राहिला; पण तिथल्या अनेक गोष्टी मुख्यत्वे पदार्थ, घरचं जेवण ते विसरू शकले नाहीत. कधी आर्थिक स्थिती जेमतेम, कधी हाती पैसे असले तरी रांधण्यासाठी हवे ते जिन्नस मिळणं अवघड; मग त्यातूनही त्यांनी मार्ग काढले. त्यातून हळूहळू उदयाला आलं ते स्ट्रीट फूड. टपरी खाणं.
आर्थिक चणचण असते तेव्हा उपलब्ध मोजक्या साधनसामुग्रीमध्ये चवदार पदार्थ, झटपट करण्याचा प्रयत्न असतो.

याचं उत्तम उदाहरण म्हणजे क्युबन आणि मेक्सिकन जेवण. क्युबा आणि मेक्सिकोतून अमेरिकेत जगायला गेले ते मजूर!  त्यांनी त्यांचं जेवण तिथं नेलं, आणि आज अमेरिकेत रस्त्यारस्त्यावर मेक्सिकन जेवणाचे फूड ट्रक दिसतात. तेच मध्य पूर्वेतील देशांचं! या लोकांनी ते जिथे गेले तिथे कबाबसारखे पदार्थ लोकप्रिय केले. दक्षिण भारतातील पदार्थ भारतात सर्वदूर का लोकप्रिय झाले? तिथून आलेल्या लोकांमुळे, त्यांनी दाखवलेल्या चविष्ट पोटभरीच्या पदार्थांमुळे!

आज मुंबईतील लोकप्रिय स्ट्रीट फूड कोणतं असं विचारलं  तर पहिले छूठ उत्तर येईल, वडापाव ! आता हा वडापाव निव्वळ आर्थिक मजबुरीतून उदयाला आलेला प्रकार. तेच उसळ, मिसळ पाव, भुर्जी पाव, अगदी समोसा पाव पण. कमी पैशात भरपूर चवदार जेवण हे स्ट्रीट फूडचं वैशिष्ट्य आणि तेच त्याच्या लोकप्रियतेचं गमक. अती उच्चभ्रू शाही हॉटेल्सपण त्यांच्याकडे त्यांच्या नाजूक साजूक खवय्यांसाठी स्ट्रीट फूड फेस्टिव्हल्स आयोजित करतात. या स्ट्रीट फूडची मोहिनीच जबरदस्त असते.

एक कारण हे की, आपल्या आयुष्याच्या संघर्षाच्या काळात अशाच स्वस्त जेवणानं आपल्याला तगवलेलं असतं, आईच्या हातच्या जेवणासाठी जसा एक हळवा कोपरा असतो, तसाच या खाण्यासाठीही असतो. आधी पर्याय नसल्याने आणि नंतर चटक लागल्यामुळे जगभरात स्ट्रीट फूड कमाल लोकप्रिय होतं- आहे आणि राहणार. या सदरात आपण अशाच स्ट्रीट फूडविषयी बोलू, ते आलं कुठून आणि रुळलं कसं याच्या कहाण्या तितक्याच चवदार आहेत!

shubhaprabhusatam@gmail.com

Web Title: The thing about kebabs and vadapav!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न