नाश्त्याच्या 'या' ५ पदार्थांमध्ये अंडीपेक्षा जास्त असतं प्रोटीन, तयार करायला लागणार नाही वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 11:41 AM2024-09-27T11:41:31+5:302024-09-27T11:42:18+5:30

Weight Loss Breakfast : प्रोटीन मिळवण्यासाठी जास्तीत जास्त लोक सकाळी नाश्त्यामध्ये अंडी खातात. मात्र, अंड्यांशिवायही असे काही पदार्थ आहेत ज्यातून तुम्हाला प्रोटीन मिळू शकतं. तेच आज जाणून घेणार आहोत.

These 5 breakfast foods contain more protein than eggs | नाश्त्याच्या 'या' ५ पदार्थांमध्ये अंडीपेक्षा जास्त असतं प्रोटीन, तयार करायला लागणार नाही वेळ!

नाश्त्याच्या 'या' ५ पदार्थांमध्ये अंडीपेक्षा जास्त असतं प्रोटीन, तयार करायला लागणार नाही वेळ!

Weight Loss Breakfast : सकाळचा नाश्ता हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. कारण सकाळच्या नाश्त्यामुळे तुम्हाला दिवसभर काम करण्याची एनर्जी मिळते. तसेच शरीराची आवश्यक पोषक तत्वांची गरजही पूर्ण होते. सामान्यपणे जे लोक कमी करण्याच्या प्रयत्नात असतात ते सकाळच्या नाश्त्यामध्ये प्रोटीनचं अधिक सेवन करतात. प्रोटीनमुळे मसल्सची वाढ होते, तसेच पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. ज्यामुळे तुम्हाला वजन नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते. प्रोटीन मिळवण्यासाठी जास्तीत जास्त लोक सकाळी नाश्त्यामध्ये अंडी खातात. मात्र, अंड्यांशिवायही असे काही पदार्थ आहेत ज्यातून तुम्हाला प्रोटीन मिळू शकतं. तेच आज जाणून घेणार आहोत.

भरपूर प्रोटीन असलेला नाश्ता

पनीर भूर्जी

सकाळी नाश्त्यामध्ये तुम्ही पनीरची भूर्जी ब्रेड किंवा पराठ्यांसोबत सेवन करू शकता. मूग डाळीसोबत याचं सेवन करू शकता. पनीरमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. तसेच यात कॅल्शिअमही भरपूर असतं.

ओट्स पोहे

पोहे हा सगळ्यात पौष्टिक नाश्ता मानला जातो. पोह्यात प्रोटीनचं प्रमाण वाढवण्यासाठी यात ओट्स मिक्स करू शकता. तसेच तुमच्या आवडीच्या भाज्याही यात टाकू शकता. 

छोल्याचं सॅंडविच

वजन कमी करण्यासाठी छोल्याच्या सॅंडविच तयार करू शकता. तुम्ही छोल्यांचा म्हणजे चण्यांचा सलादही बनवू शकता. चण्यांममध्ये भरपूर प्रोटीन असतं आणि यामुळे पोट जास्तवेळ भरलेलं राहतं. चणे बारीक करून सॅंडविच स्प्रेडही बनवू शकता. 

बेसन पोळा

प्रोटीन भरपूर असलेल्या बेसनामध्ये वेगवेगळ्या भाज्या टाकून तुम्ही बेसन पोळाही बनवू शकता. बेसनाचा पोळा तयार करायलाही जास्त वेळ लागत नाही आणि सकाळी नाश्त्यात याचं सेवन करू शकता.

मूग डाळीचा पोळा

केवळ बेसनच नाही तर मूग डाळीमध्येही भरपूर प्रोटीन असतं. मूग डाळ रात्रभर भिजवून ठेवा आणि सकाळी ती बारीक करून त्यात तिखट-मीठ, मसाले टाकून पोळा तयार करा. मूग डाळीच्या पोळ्याचं सेवन तुम्ही हिरव्या चटणीसोबतही करू शकता.

Web Title: These 5 breakfast foods contain more protein than eggs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.