हे आहेत थंडीत बाजरीची भाकरी खाण्याचे फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 03:09 PM2019-12-11T15:09:11+5:302019-12-11T15:13:56+5:30
थंडीत आवर्जून आहारात समावेश करावा असा पदार्थ आहे बाजरीची भाकरी
Next
पुणे : उशिरा का होईना राज्यात सध्या थंडीला सुरुवात झाली आहे. मात्र फक्त बाहेरून स्वेटर घालून उष्णता निर्माण करण्यापेक्षा शरीराला आतून आवश्यक ते घटक देण्याची गरज हिवाळ्यात असते. अशावेळी तीळ, बाजरी, हुलग्याचे सेवन केले जाते. यातलाच एक महत्वाचा घटक म्हणजे बाजरीची भाकरी. चला यात जाणून घेऊया हिवाळ्यात बाजरीची भाकरी सेवन करण्याचे खास फायदे.
- बाजारात पोटॅशियम, मॅग्नेशियमसारखे महत्वाचे घटक असतात.त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
- बाजरीच्या गव्हाच्या चपातीपेक्षा कमी कॅलरी असतात. त्यामुळे वजन वाढत नाही.
- बाजरी उष्ण असते. त्यामुळे थंडीत शरीराच्या आत ऊर्जा निर्माण करते.
- बाजरीमुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी राहते,
- बाजारीत तंतुमय घटक अधिक असतात, त्यामुळे पचनक्रियेस मदत मिळते.तसेच बद्धकोष्ठतेपासून बचाव होतो.
- बाजरीच्या भाकरीने पोट भरल्यासारखे वाटते. एकदा जेवल्यावर सारखे जेवण्याची इच्छा होत नाही.