लोणचं टिकवण्यासाठी 'या' टिप्स ठरतील फायदेशीर!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 04:34 PM2018-10-28T16:34:48+5:302018-10-28T16:35:34+5:30
भारतीय जेवणाचं ताट हे लोणच्याच्या फोडीशिवाय अपूर्ण असतं, असं म्हटलं तरीदेखील वावगं ठरणार नाही. आंबट-गोड लोणचं जेवणाची चव आणखी वाढवण्याचं काम करतं. घरी तयार केलेलं लोणचं फार जपून ठेवलं जातं.
भारतीय जेवणाचं ताट हे लोणच्याच्या फोडीशिवाय अपूर्ण असतं, असं म्हटलं तरीदेखील वावगं ठरणार नाही. आंबट-गोड लोणचं जेवणाची चव आणखी वाढवण्याचं काम करतं. घरी तयार केलेलं लोणचं फार जपून ठेवलं जातं. सध्या हिवाळ्याची चाहुल लागली असून वातावरणामध्येही गारवा जाणवू लागला आहे. तसं पाहायला गेलं तर लोणचं हा फार काळ टिकणारा पदार्थ पण बदलत्या वातावरणामुळे किंवा अस्वच्छ हात लागल्याने लोणचं खराब होऊ शकतं. असातच आज आपण लोमचं कोणत्याही ऋतूमध्ये टिकवण्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहोत.
- लोणच्याच्या बरणीचे तोंड सूती कपड्याने बांधून ठेवा.
- लोणचं तयार करताना ज्या मसाल्यांचा वापर करणार आहात. ते सर्वात आधी भाजून घ्या. त्यामुळे मसाल्यांमधील पाण्याचा अंश निघून जातो. त्यामुळे ते जास्त टिकण्यास मदत होते.
- जर लोणच्यामध्ये कमी तेल टाकलंत तर ते लगेच खराब होतं. त्यामुळे लोणचं तयार करताना त्याचा अधिक वापर करा. त्यामुळे लोणचं खराब होमार नाही.
- दररोज जेवताना लोमचं खात असाल तर ते वेगवेगळ्या काचेच्या बरण्यांमध्ये काढून घ्या. सतत लोणच्याची बरणी उघड-बंद केल्यामुळे देखील ते खराब होऊ शकतं.
- लोणचं तयार करताना फक्त काचेच्या भांड्यांचाच वापर करा. एल्युमिनिअम किंवा इतर कोमत्या भांड्यामध्ये लोणचं तयार करू नका. जास्त वेळ टिकत नाही