हेल्दी समजले जाणारे 'हे' पदार्थ, असतात अनहेल्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 11:08 AM2019-08-06T11:08:53+5:302019-08-06T11:10:15+5:30
असे अनेक पदार्थ आहेत. जे हेल्दी सांगून बाजारात विकले जातात पण खर तर ते पदार्थ शरीरासाठी अत्यंत घातक असतात. त्यामुळे खाण्याच्या या पदार्थांना लगेचच आपल्या किचनमधून आणि आपल्या डाएटमधून बाहेर काढा अन् हेल्दी राहा...
तुमच्याही मनात कधीतरी हा प्रश्न आलाच असेल की, आपल्याला डाएटबाबत मार्गदर्शन करणाऱ्या न्यूट्रिशनिस्ट्स आणि डायटिशन्स यांच्या किचनमध्ये नक्की कोणते पदार्थ असतात? इतरांना हेल्दी आणि बॅलेस्ड डाएट फूड खाण्याचा सल्ला देणारे स्वतः आपलं किचन कसं ठेवतात? याचं उत्तर आहे की, असे अनेक पदार्थ आहेत. जे हेल्दी सांगून बाजारात विकले जातात पण खर तर ते पदार्थ शरीरासाठी अत्यंत घातक असतात. त्यामुळे खाण्याच्या या पदार्थांना लगेचच आपल्या किचनमधून आणि आपल्या डाएटमधून बाहेर काढा अन् हेल्दी राहा...
पॅकेज्ड फ्रूट ज्यूस
पॅकेज्ड फ्रूट ज्यूसचं सेवन करणारे जास्तीत जास्त लोकांना हेच वाटतं की, ते हेल्गी ऑप्शन्स वापरत आहेत आणि हेल्दी ज्यूस पित आहेत. परंतु खरं तर, हेल्दी वाटणाऱ्या पॅकेज्ड ज्यूसमध्ये सोडा असणाऱ्या ड्रिंक एवढीच साखर वापरण्यात आलेली असते. त्यामुळे पॅकेज्ड ज्यूसऐवजी फ्रेश ज्यूसचा आहारात समावेश करा. तसेच हेल्दी राहायचं असेल तर ज्यूसऐवजी सर्वात उत्तम पर्याय म्हणजे, फळं. फळामध्ये मुबलक प्रमाणात फायबर असतं. त्यामुळे ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
(Image Credit : Grow Fit)
सोया मिल्क
जर तुम्ही नॉर्मल दूधाऐवजी सोया मिल्कचा आहारात समावेश करत असाल तर असं अजिबात करू नका. खरं तर सोया मिल्क आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे असं सांगितलं जातं. पण जर तुम्ही मर्यादेपेक्षा जास्त याचं सेवन करत असाल तर त्यामुळे शरीरामध्ये अॅस्ट्रोजन रिसेप्टर अॅक्टिव्ह होतात. ज्यामुळे शरीराला अनेक प्रकारच्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे असं करणं त्वरित थांबवा.
न्यूट्रिशन बार
न्यूट्रिशन बार खाण्यासाठी अत्यंत चविष्ट लागतात आणि अनेकदा आपलं पोट भरण्यासाठी मदत करतात. परंतु, यामध्ये आढळून येणाऱ्या कॅलरीज, फॅट आणि कार्ब्स बर्न करणं फार अवघड असतं. त्यामुळे यांचं सेवन करण्याऐवजी फ्रेश फळांचं सेवन करा.
फ्लेवर्ड ओटमील
कोणतंही असं फूड प्रोडक्ट ज्यामध्ये कॉर्न सीरप, ऐडेड शुगर आणि ट्रान्स फॅट असतात. ते लगेच तुम्हाला किचनमधून बाहेर काडलं पाहिजे. यांपैकी एक म्हणजे, फ्लेवर्ड ओटमीलचे पॅकेट्स. यांमध्ये ट्रान्सफॅट मुबलक प्रमाणात असतं. जे शरीरामध्ये गुड कोलेस्ट्रॉल कमी करून हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढवतं.
क्रीम बेस्ड सूप
सूप आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात, हे तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे. परंतु, बाजारात विकण्यात येणारे पॅकेट सूपऐवजी तुम्ही ताज्या भाज्यांपासून सूप तयार करून त्याचा आहारात समावेश केला तर ते फायदेशीर ठरतं. बाजारात मिळणाऱ्या पॅकेज्ड सूपमध्ये हायड्रोलाइज्ड प्रोटीन, फूड डाय आणि कॉर्स सीरपचे प्रमाण अधिक असते. जे आरोग्यासाठी नुकसानदायी असतं.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.