मूड कंट्रोल करतात हे पौष्टिक तत्वे, डाएटमध्ये करा समावेश!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 10:46 AM2018-10-01T10:46:47+5:302018-10-01T10:48:10+5:30
आपल्या आहारात असे अनेक पौष्टीक तत्व असतात ज्यांची आपल्या शरीराला फार कमी प्रमाणात गरज असते. हे पौष्टीक तत्व भलेही कमी प्रमाणात घेतले जातात पण त्यांच्यामुळे आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं.
आपल्या आहारात असे अनेक पौष्टीक तत्व असतात ज्यांची आपल्या शरीराला फार कमी प्रमाणात गरज असते. हे पौष्टीक तत्व भलेही कमी प्रमाणात घेतले जातात पण त्यांच्यामुळे आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं. आपल्या शरीरात होणाऱ्या हार्मोन्सच्या बदलांमुळे आपल्या मूडमध्येही बदल होत राहतो.
१) कॉपर
आपल्या शरीराकडून कॉपर निर्मित केला जात नाही. शरीरात कॉपर नावाच्या तत्वाची कमतरता भरून काढण्यासाठी कॉपर असलेले पदार्थ खाल्ले पाहिजे. कारण कॉपर शरीरात कमी झाल्याने ओस्टोपोरोसिस, आर्थरायटस, कार्डियोवॅस्कुलर संबंधी आजार, कोलोन कॅन्सर, हाडांशी संबंधित आजार होण्याचा धोका असतो.
कॉपरची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्या आहारात कडधान्य, डाळी, चॉकलेट, शेंगदाणे, किशमिश, बटाटे, मटर, मशरूम, हिरव्या भाज्या, फळे जसे की, नारळ, पपई, सफरचंद इत्यादींचा समावेश करावा.
२) आयोडिन
आयोडिन आपल्या शरीरात थायरॉइडच्या कार्यप्रणालीला मजबूत करतो. त्यासोबतच आयोडिन आपल्या डोळ्यांचा आतील ग्रंथी, लाळ ग्रंथी आणि रक्तवाहिन्यांना मजबूत करतं. शरीरात आयोडिनच्या कमतरतेमुळे लहान मुलांची शारीरिक क्षमता कमजोर होते. ब्रेस्ट कॅन्सर, पोटाचा कॅन्सर होण्याचाही धोका असतो. शरीरात आयोडिनची कमतरता भरून काढण्यासाठी सी-फूड आणि आयोडिनयुक्त पदार्थांचं सेवन करायला हवं.
३) झिंक
हे आपल्या शरीरासाठी फार महत्त्वाचं तत्व आहे. लहान मुलांमध्ये याची कमतरता असेल तर त्यांचा विकास होत नाही, त्यांना पुन्हा पुन्हा इन्फेक्शनची समस्या होऊ लागते. मोठ्या व्यक्तींमध्ये झिंकची कमतरता असेल तर इन्फर्टिलटी आणि त्वचा संबंधी आजार होण्याचा धोका असतो. झिंकची कमतरता भरून काढण्यासाठी कडधान्य आणि ड्रायफ्रूट्सचा आहारात समावेश करावा.
४) सेलेनियम
सेलेनियम एक असं तत्व आहे जे आपल्या शरीरात अॅंटीऑक्सिडेंट्स एंजाइमची निर्मिती करण्यास मदत करतं. सूर्यफुलाच्या बीया, अंडी, मशरूम, गहू, बाजरी, ब्राऊन राईस, ओट्स आणि कांद्यामधून सेलेनियमची कमतरता भरून काढता येते.
५) फ्लोराइड
दातांच्या मजबूतीसाठी आपल्या शरीराला याची गरज कमी प्रमाणात असते. यासाठी हे टूथपेस्ट तयार करण्यासाठी वापरलं जातं, जेणेकरून दातांची समस्या होऊ नये. आहारात फ्लोराइडचं प्रमाण अधिक असलं की, हाडांची समस्या होऊ शकते. चहामध्येही फ्लोराइड अधिक प्रमाणात आढळतं.
६) मोलीबेडिनम
शरीरात याची कमतरता असेल तर वेगवेगळ्या प्रकारचा कॅन्सर होण्याचा धोका असतो. तर लहान मुलांच्या शरीरात याचं प्रमाण अधिक असल्यास त्यांना श्वासासंबंधी समस्या होण्याचा धोका असतो. याची कमतरता भरून काढण्यासाठी अंडी, डाळी आणि सूर्यफुलाच्या बीयांचा आहारात समावेश करावा.