तिहार किचन रेस्टॉरण्ट. हे रेस्टॉरण्ट तिहारमधील कैदी चालवतात.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 07:21 PM2017-09-13T19:21:09+5:302017-09-13T19:26:45+5:30
तिहारमधील कैद्यांनीही काळानुरु प त्यांच्या रोजगाराचं साधन शोधण्यास सुुरूवात केली आहे. लवकरच तिहारमधील कैद्यांनी सुरु केलेले ‘तिहार किचन ’हे रेस्टॉरण्ट लॉन्च होतंय. तिहार कारागृहात शिक्षा भोगत असलेले संजीव, एमडी सबीर, आसिफ मोहम्मद हे तिघेही या रेस्टॉरण्टची जबाबदारी सांभाळत आहेत.
- सारिका पूरकर गुजराथी
तिहार..जगातील सर्वात मोठ्या आणि प्रमुख कारागृहांपैकी एक कारागृह. किरण बेदी यांनी तिहार कारागृहाच्या अधीक्षक म्हणून सुत्रं हाती घेतल्यानंतर तिहारचा कायापालटच करु न टाकला. तिहारमध्ये दाखल झालेले कैदी हे देखील माणूसच आहेत, त्यांनाही त्यांच्या चूकांच्या शिक्षेबरोबरच सर्वसामान्यांसारखे जीवन जगण्याची एक संधी मिळायलाच हवी म्हणून अनेक नवनवीन उपक्र म राबविले. कैद्यांचं मानसिक, शारीरिक स्वास्थ्य तसेच पुर्नवसन या तीन बाबींसाठी त्यांनी रोजगाराच्या संधी निमार्र्ण करणारे प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली. पेण्टिंग, सुतारकाम, संगणक शिक्षण, विणकाम या रोजगाराभिमुख प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी कैद्यांना स्वावलंबनाचा मार्ग दाखवला. हजारो कैद्यांना यामुळे जीवनाची नवी दिशा सापडली. किरण बेदी यांनी तिहार जेलचं नावच बदलून तिहार आश्रम ठेवलं. थोडक्यात कैद्यांच्या वेषातील गुन्हेगारांना माणसात आणण्याचे त्यांचे हे प्रयत्न यशस्वी झाले होते .तर असे हे तिहार कारागृह पुन्हा एकदाच चर्चेत आलं आहे.
आता तिहारमधील कैद्यांनीही काळानुरु प त्यांच्या रोजगाराचं साधन शोधण्यास सुुरूवात केली आहे. लवकरच तिहारमधील कैद्यांनी सुरु केलेले ‘तिहार किचन ’हे रेस्टॉरण्ट लॉन्च होतंय..
अधिकृतपणे घोषणा न झालेल्या या रेस्टोमध्ये आत्ताच दिवसाकाठी 15-20 नागरिक भेट देऊन भोजनाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. तिहार कारागृहात शिक्षा भोगत असलेले संजीव, एमडी सबीर, आसिफ मोहम्मद हे तिघेही या रेस्टॉरण्टची जबाबदारी सांभाळत आहेत. तिहारपासूून अर्धा किलोमीटरपर्यंतच्या परिसरातील खान मार्केटमधील चायना फेअर नावाच्या रेस्टॉॅरण्ट मालकांनी मेकओव्हर करून हे रेस्टॉंरण्ट तिहारला देऊ केलं आहे. या रेस्टॉरण्टमधील मेन्युही लाजबाब, लजीज असाच आहे बरं का ! भारतीय आणि चायनीज पदार्थ येथे उपलब्ध आहेत. पिंडी चना, आलू गोभी, कढाई पनीर, तंदुरी मसाला चाप, सीख कबाब, रोगन गोष, मंचुरियन, चिली पनीर, सिंगापूर नूडल्स, हक्का नूडल्स अशी ही रूचकर यादी आहे. विशेष म्हणजे या पदार्थांसाठी लागणारे सर्व मसाले हे तिहारमधील कैदी बांधवांनीच बनवलेले आहेत.
गुन्हेगार म्हणून एखाद्या व्यक्तीवर जेव्हा शिक्कामोर्तब होतो, तेव्हा साहजिकच समाजाचा त्या व्यक्तिकडे बघण्याचा दृष्टिकोन हा गढूळ होतो. रेस्टॉरण्ट चालविणारा कैदी, आसिफला देखील हीच चिंता सतावत होती. तो म्हणतो की, ‘मी सुरूवातीला खूप नर्व्हस होतो. कारण मला स्वत:ला हा आत्मविश्वास नव्हता की मी रेस्टॉॅरण्टमध्ये येणा-याकडून आॅर्डर्स व्यवस्थित घेऊ शकेल का ? शिवाय नागरिक माझ्याशी कसे वागतील? का प्रश्नही सतत पडायचा.’
परंतु, तिहार कारागृहाचे महासंचालक, सुधीर यादव यांनी मात्र या प्रोजेक्टकडे खूप सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं आहे. ते म्हणतात, ‘पूर्वी आम्ही कैद्यांना जे व्यावसायिक, रोजगाराभिमुख प्रशिक्षण द्यायचो, त्याचा प्रत्यक्षात उपयोग खूप कमी होत होता. कारण जे प्रशिक्षण त्यांनी घेतले आहे, त्या आधारावर नोकरी मिळवणं, स्वत:चा व्यवसाय सुरु करणं हे त्यांच्यासाठी खूप अवघड होतं. परंतु, या प्रोजेक्टमुळे त्यांना त्वरित रोजगार उपलब्ध होऊ शकतो. कैद्यांना समाजात वावरताना कोणताही न्यूनगंड राहू नये म्हणून हा प्रोजेक्ट खूप मदत करणारा असणार आहे. जेव्हा ते शिक्षा पूर्ण करु न बाहेर पडतील, तेव्हा समाजात एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून मिसळण्यासाठी त्यांना वेळ लागणार नाही.’
तर रेस्टॉरण्टचे संचालक अमेन लॅमेंग्टन म्हणतात की ‘ या कैदी बांधवांना चार महिन्यांपासून पाककृतींचे तसेच इतर व्यवहारी बाबींचे प्रशिक्षण देण्यात आलं. जेणेकरून तिहारमधून बाहेर पडल्यावर देखील ते त्यांना उपयोगी पडेल. नंतरही ते आमच्यासोबत काम करु इच्छित असल्यास आम्ही त्यांना नक्कीच संधी देणार आहोत.’
दरम्यान, हे तिघेही कैदी या रेस्टॉरण्टमधील त्यांना नेमून दिलेली कामं तसेच यानिमित्त सर्वसामान्य नागरिकांशी होत असलेला संवाद एन्जॉय करताहेत. संजीव म्हणतो, ‘रेस्टॉरण्टमधील कामासाठी पगार दिला जात नसला तरी ग्राहकांकडून मिळणा-या टिप मात्र दिल्या जातात. मात्र याबद्दल आमची तक्र ार नाही. कारण या वातावरणात काम करणं खूप छान अनुभव देणारं आहे.
तिकडे तिसरा कैदी सबीर हा देखील खूप खुश आहे. त्याची पत्नी त्याला भेटण्यासाठी येत असते.ती तर म्हणते, ‘तिहार किचनने सबीरला अशा डिश देखील करायला शिकवल्या आहेत, की ज्या मी घरी कधीच बनवलेल्या नाहीयेत. सबीर म्हणतो, कोरमा, बिर्याणी, कबाब या डिशेश मी बनवायचो परंतु या रेस्टॉरण्टमुळे मला खूप नवीन शाकाहरी डिशेश शिकता आल्या.’
तर कैद्याच्या वेशातील माणसाला माणसात आणण्यासाठीचे हे रेस्टॉरण्ट खवय्यांनाही नक्कीच भावेल, यात शंका नाही. असं असलं तरी सबीर, संजीव, आसिफ या तिघांनी तिहारमधून बाहेर पडल्यानंतर (कारण यापैकी सबीर या वर्षअखेरीस शिक्षा पूर्ण करु न बाहेर पडणार आहे ) हाच व्यवसाय करायचा असं काहीही ठरवलं नाहीये. त्यांनी तर खूप छान स्वप्नं पाहिली आहेत. संजीव आणि सबीर हे दोघेही गुन्हेगार म्हणून तिहारमध्ये येण्यापूर्वी वाहनचालक म्हणून काम करीत होते, म्हणूनच येथून बाहेर पडल्यानंतर स्वत:चं वाहन घेऊन त्याद्वारे व्यवसाय करण्याचं त्यांनी ठरवलं आहे, तर आसिफला पूर्वीपासून शरीरसौष्ठत्वाची आवड होती, त्यानुसार एका मित्राच्या ओळखीनं त्याने दक्षिण-पश्चिम दिल्लीतील एका जिममध्ये नोकरी देखील मिळवली आहे..
तिहारमधील कैद्यांना ही स्वप्नं बघण्याचा आत्मविश्वास या रेस्टोनं दिला नसेल तर नवलच!