टोमॅटो ज्यूसचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 11:58 AM2019-01-03T11:58:56+5:302019-01-03T12:02:06+5:30
टोमॅटोचा वापर भाजींमध्ये करण्यासोबत अनेकजण सलाद म्हणूनही केला जातो. टोमॅटो खाण्याचे अनेक फायदे होतात हे काही तुम्हाला वेगळं सांगायला नको.
टोमॅटोचा वापर भाजींमध्ये करण्यासोबत अनेकजण सलाद म्हणूनही केला जातो. टोमॅटो खाण्याचे अनेक फायदे होतात हे काही तुम्हाला वेगळं सांगायला नको. पण तुम्हाला टोमॅटो ज्यूसचे फायदे माहीत आहेत का? खरंतर अनेकांना टोमॅटो ज्यूसचे फायदे माहीत नसतात. त्यामुळे आम्ही टोमॅटो ज्यूसने होणारे फायदे तुम्हाला सांगणार आहोत.
हिवाळा असो वा उन्हाळा प्रत्येक ऋतूमध्ये टोमॅटोचा वापर १२ महिने केला जातो. महत्त्वाची बाब म्हणजे टोमॅटोचा असा काही सीझनही नसतो. चला जाणून घेऊ टोमॅटो ज्यूसच्या सेवनाने त्वचा आणि डिप्रेशनवर काय प्रभाव पडतो.
टोमॅटो आणि त्वचा
ब्रिटनच्या न्यूकॅसल यूनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या एका शोधात आढळलं की, टोमॅटोमध्ये एक असं तत्व आहे जे त्वचेच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण आहे. टोमॅटोमध्ये आढळणारं लायकोपेन अॅंटी-एजींगची समस्या दूर करण्यास मदत करतं. हिवाळ्यात टोमॅटो ज्यूसचं अधिक सेवन केल्याने त्वचेला होणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांपासून बचाव केला जाऊ शकतो. सूर्यकिरणांमुळे त्वचेला होणाऱ्या समस्याही टाळल्या जाऊ शकतात.
किडनी स्टोन असताना टोमॅटो टाळावं?
जर तुम्हाला चांगली त्वचा हवी असेल आणि नेहमी तरुण दिसायचं असेल तर रोज एक टोमॅटोचं सेवन करावं. जर टोमॅटोच्या ज्यूसचं सेवन केलं जर जास्त फायदा होऊ शकतो.
टोमॅटो आणि डिप्रेशन
टोमॅटोच्या सेवनामुळे डिप्रेशनच्या समस्येपासून बचाव केला जाऊ शकतो. हे बाब अनेक शोधांमधून समोर आली आहे. टोमॅटोमध्ये आढळणारे व्हिटॅमिन्स व्यक्तीला स्ट्रेस आणि डिप्रेशनच्या समस्येतून बाहेर काढतं.
हृदयरोग दूर ठेवण्यासाठी फायदेशीर
डेली मेलने दिलेल्या एका वृत्तानुसार, टोमॅटोने तणाव कमी करण्यास मदत मिळते. अभ्यासकांनी दावा केला आहे की, जे लोक आठवड्यातून दोन ते सहा टोमॅटो खातात, त्यांना टोमॅटो खात नसलेल्या व्यक्तींच्या तुलनेत ४६ टक्के कमी तणाव होतो.
एका आठवड्यात किती टोमॅटो खावे?
टोमॅटोमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट तत्व भरपूर प्रमाणात असतात, याने वेगवेगळ्या आजारांपासून बचाव केला जाऊ शकतो. टोमॅटोमुळे रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात वाढते.