गुलाबजाम ट्रिफल -पानीपुरी शॉटस.. आपले नेहेमीचे पदार्थही फॅशनेबल होता आहेत. तुम्ही ट्राय केलेत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 06:53 PM2017-09-06T18:53:38+5:302017-09-06T19:05:42+5:30

फ्यूजन डेझर्ट ही संकल्पना सध्या गोडाच्या पदार्थांमध्ये  रूजतेय. गुलाबजाम, लाडूृ यासारख्या पारंपारिक पदार्थांना नवलाईचा, इंडो- वेस्टर्नचा साज चढवला जातोय.या नव्या चवी ढवीतले हे नेहेमीचेच पदार्थ अजूनच रूचकर झालेत.

Triffle and shots gaves fusion look to our indain deserts and drinks | गुलाबजाम ट्रिफल -पानीपुरी शॉटस.. आपले नेहेमीचे पदार्थही फॅशनेबल होता आहेत. तुम्ही ट्राय केलेत का?

गुलाबजाम ट्रिफल -पानीपुरी शॉटस.. आपले नेहेमीचे पदार्थही फॅशनेबल होता आहेत. तुम्ही ट्राय केलेत का?

Next
ठळक मुद्दे* ट्रिफल म्हणजे इंग्लंडमधीलअत्यंत लोकप्रिय गोडाचा पदार्थ आहे. भारतात आता ट्रिफलची चव भारतीय गोड पदार्थांना दिली जातेय.* पारफेत हे फ्रेंच आणि अमेरिकन स्टाइल डेझर्ट आहे. थोडासा ट्रीफल टच या डेझर्टला देखील आहे. भारतातील गोड पदार्थांना पारफेत टच द्यायचा झाल्यास बुंदीचा लाडूृ हा बेस्ट आॅप्शन ठरलाय.* सध्या ज्यूसेस, मिल्कशेक्स यांना शॉट्सच्या स्वरुपात पेश करण्याचा ट्रेण्ड  सेट होतोय. एवढंच नाही तर पाणीपुरी, कॉर्न भेळ हे चाटचे प्रकारही शॉट्सच्या रूपात सर्व्ह केले जात आहे.




- सारिका पूरकर-गुजराथी



भारतात तोंडी लावण्याच्या चटणीपासून तर पाहुणचारासाठीच्या गोड पदार्थांपर्यंत प्रत्येक पदार्थाचे भरपूर चविष्ट प्रकार आढळतात. गोड पदार्थांमध्येही भारतात प्रत्येक राज्यात विविध सणावारांसाठी विविध पदार्थ आढळतात. या पदार्थांची खासियत म्हणजे हे पदार्थ घरगुती, पारंपारिक पद्धतीनं केले जातात. म्हणूनच भारतात पारंपरिक पदार्थांचा एक खजिनाच दडलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता मात्र काळानुरुप भारतातही फूड कल्चरमध्ये बदल होऊ लागले आहेत. हॉटेल, रेस्टारण्ट संस्कृतीमुळे तर या पदार्थांना आणखीनच महत्व प्राप्त होऊ लागलं आहे. कारण सध्या भारतात सर्वत्रच घरगुती चवीच्या पदार्थांना प्रचंड मागणी वाढली आहे. म्हणूच पारंपरिक, विशेष करुन गोडाच्या पदार्थांनाच थोड्या वेगळ्या ढंगात सादर करण्याचा प्रयत्न सध्या होतोय. फ्यूजन डेझर्ट ही संकल्पना सध्या गोडाच्या पदार्थांमध्ये चांगयलीच रूजतेय. गुलाबजाम, लाडूृ यासारख्या पारंपारिक पदार्थांना नवलाईचा, इंडो- वेस्टर्नचा साज कसा चढवला जातोय ते एकदा वाचून पाहाच.

ट्रिफल

 इंग्लंडमधील हा अत्यंत लोकप्रिय गोडाचा पदार्थ आहे. ट्रिफल म्हणजे एकप्रकारचं पुडिंग. भरपूर फळं, स्पॉज, केकचे तुकडे, कस्टर्ड यांचा उपयोग करुन ट्रिफल बनवले जातात. मोठ्या काचेच्या बाऊलमध्ये किंवा मग लहान, मध्यम उंचीच्या ग्लासमध्ये तीन लेअरमध्ये हे घटक अरेंज करुन फ्रीजमध्ये सेट करुन सर्व्ह केले जातात. कस्टर्ड वापरायचे नसेल तर सढळ हातानं फेसलेल्या क्रीमचा वापर यात केला जातो. भारतात आता ट्रिफलची चव भारतीय गोड पदार्थांना दिली जातेय.

1) गाजर हलवा ट्रिफल
नेहमी जो गाजर हलवा बनवतो तोच हलवा पण ट्रिफलच्या रुपात.ट्रिफल ग्लासमध्ये गाजर हलवा. त्यावर फेसलेलं क्रीम, यावर पिस्त्याची भरड पुन्हा हाच क्रम रिपिट करुन थर लावले अन् सेट केले की गाजर हलवा ट्रिफल तयार.


 

2) गुलाबजाम ट्रिफल
पाकातील किंवा कोरडे (सुका जामून) गुलाबजाम खाऊन नको नको झालं असेल तर गुलाबजाम ट्रिफल म्हणजे गुलाबजामच्या शाही अंदाजाचा अनुभव घेण्यास हरकत नाही. या ट्रिफलमध्ये ग्लासमध्ये स्पॉज केकचे तुकडे, त्यावर कस्टर्ड, त्यावर गुलाबजामचे अर्ध्या आकारात कापलेले तुकडे आणि त्यावर फेसलेल्या क्रीमचा थर देऊन देसी गुलाम्बजामचा विदेशी लूक तयार होतो.

बुंदी लाडूचे पारफेत

नाव जरा वेगळं वाटतंय ना ऐकायला. पारफेत हे फ्रेंच आणि अमेरिकन स्टाइल डेझर्ट आहे. थोडासा ट्रीफल टच या डेझर्टला देखील आहे. डेझर्टच्या या प्रकारात व्हॅनिला आइस्क्रीम, जिलेटीन, फेसलेलं क्रीम, फळं यांचा वापर केला जातो. भारतातील गोड पदार्थांना पारफेत टच द्यायचा झाल्यास बुंदीचा लाडूृ हा बेस्ट आॅप्शन ठरलाय. क्रीमऐवजी भारतीय रबडीचा वापर करुन कमी साहित्यात हा पदार्थ तयार केला जातोय. मोतीचूर लाडूचा हलक्या हातानं चुरा करुन ग्लासमध्ये पसरवून त्यावर घट्ट रबडीचा थर व त्यावर भरपूर काजू, बदाम अन पिस्त्याची भरड घालावी.

गुलाबजाम चीजकेक

हा प्रकारही फ्युजन डेझर्ट म्हणून भारतात लोकप्रिय होतोय. मारी बिस्किटचा चु-याचा थर, त्यावर गुलाबजामच्या अर्ध्या आकारातील तुकड्यांचा थर आणि त्यावर क्रीम चीज, जिलेटीन, साखर, फेसलेलं क्रीम या मिश्रणाचा थर द्यावा. ते फ्रीजमध्ये सेट केलं की हा गुलाबजाम चीजकेक तयार होतो. एगलेस शिवाय बेकिंगची झंझट नाही. प्लस चवही हटके . एकाचवेळेस गुलाबजाम आणि केकची चव घेता येते.
हे झाले काही बेसिक भारतीय ट्रिफल. मात्र यात विविध बदल करुन आपण ट्रिफलच्या विविध रेसिपी सहज ट्राय करु शकतो. उदाहरणार्थ रबडी विथ गुलाबजाम किंवा फिरनीसोबत गुलाबजाम. त्याचप्रमाणे रसमलाई ट्रिफल, संदेश ट्रिफल हे पर्याय देखील तितकेच चवदार लागतील यात शंका नाही..

सध्या ज्यूसेस, मिल्कशेक्स यांना शॉट्सच्या स्वरुपात पेश करण्याचा ट्रेभ्ण्ड सेट होतोय. एवढंच नाही तर पाणीपुरी, कॉर्न भेळ हे चाटचे प्रकारही शॉट्सच्या रूपात सर्व्ह केले जाताहेत. तसं तर शॉटस् म्हणजे कमी प्रमाणात घेतले जाणारे ड्रिंक. हे ड्रिंक घेण्यासाठी लहान आकाराचेच ग्लासेस वापरले जातात.. पण सध्या ज्यूस आणि मिल्कशेकचा शॉट्स अवतार जाम फेमस होतोय.

 

पाणीपुरी शॉटस

लहान ग्लासांमध्ये विविध फ्लेव्हर्सचे पाणी (पुदीना, चिंचेचं पाणी इ.) भरुन त्यावर उकडलेले हरभरे, बटाटा भरलेली पुरी ठेवली की पाणीपुरी शॉट्स तयार.. कॉर्नभेळही शोट्स ग्लासमध्ये भरली, त्यावर नाचोज चिप्स खोवले की भेळ शॉट्स तयार . ड्रिंक्सच्या बाबतीत मात्र पान शॉट्स हा प्रकार खूप लोकप्रिय ठरला आहे. विड्याची पानं ही पचनशक्तीसाठी लाभदायक असतात. म्हणूनच ही पानं, गुलकंद, व्हॅनिला आइस्क्रीम, दूध आणि थोडी बडीशेप घालून तयार केलेले हे ड्रिंक अतिशय हेल्दी आणि टेस्टी असते. याचप्रकारे मँगो शॉट्सही तयार होते. शॉट्सला हेल्दी टच द्यायचा असेल तर नारळाचं पाणी, काळीमिरी पूड, आल्याचा रस, मध, हळद घालून केलेले ड्रिंक शॉट्स म्हणून सर्व्ह करता येते. तसेच गाजर-संत्री, आल्याचा ज्यूस, काकडी- पुदीना-लिंबाचा ज्यूस, पालक-बीटरुट ज्यूस असे हेल्दी शॉट्सही सध्या चर्चेत आहेत. ट्राय करून बघायला काय हरकत आहे?


-

Web Title: Triffle and shots gaves fusion look to our indain deserts and drinks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.