अ‍ॅल्युमिनियमच्या भांडयातलं विषारी सत्य

By admin | Published: April 26, 2017 05:30 PM2017-04-26T17:30:47+5:302017-04-26T17:30:47+5:30

अ‍ॅल्युमिनियममध्ये विषारी घटक असतात जे मानवाच्या आरोग्यला हानिकारक असतात हे काही आज कालचं संशोधन नसून जवळ जवळ शंभर वर्षांपूर्वी झालेल्या अभ्यासातून हे सत्य पुढे आलं आहे.

The truth about the aluminum rust | अ‍ॅल्युमिनियमच्या भांडयातलं विषारी सत्य

अ‍ॅल्युमिनियमच्या भांडयातलं विषारी सत्य

Next




प्रत्येक बाबतीत पैशानं परवडणाऱ्या गोष्टींचा विचार करून कसं चालेल? आणि प्रश्न जेव्हा आरोग्याचा येतो तेव्हा काय परवडतं यापेक्षाही काय चांगलं याचा विचार व्हायला हवा.
आता आपल्या स्वयंपाकघरातल्या अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यांचंच घ्या ना. आता तुम्ही म्हणाल त्या बिचाऱ्या अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्याचा आणि आरोग्याचा कोणता आलाय संबंध? पण संबंध आहे.

 

 

 


पण नॉनस्टिकची भांडी वापरतानाही ती जपून वापरावी लागतात. कारण या भांड्यांना टेफलॉन कोटिंग असतं. त्याच्याखाली अ‍ॅल्युमिनियम असत. हे टेफलॉन अन्नपदार्थांचा आणि अ‍ॅल्युमिनियमच्या संपर्काला रोखतं. पण हे कोटिंग निघालं की मात्र अ‍ॅल्युमिनियमशी अन्नघटकांचा संबंध येवून ते पदार्थात मिसळू लागतं. म्हणून नॉनस्टिक भांडी वापरताना त्यांचं कोटिंग सांभाळणं गरजेचं असतं. ही भांडी घासतांना टोकदार दातांच्या घासण्यांनी ,स्टीलच्या घासण्यांनी घासू नये. मऊ किंवा नॉयलॉनच्या घासण्यांनी ही भांडी घासली तर हे कोटिंग टिकू शकतं.
पण नॉंनस्टिक भांड्यातील टेफलॉन या घटकाबद्दलही एक संशोधन झालं असून ते संशोधन सांगतं की हे टेफलॉन जर कायम आपल्या वापरात असेल तर रोगप्रतिकारशक्ती कमी होवून किडनीचे आजार होवू शकतात.शिवाय कर्करोगाचीही शक्यता असते. नॉनस्टिक भांडे जर मोठ्या आचेवर तापवले तर हे टेफलॉन घातक ठरू शकतं. म्हणून म्हणून पाच मिनिटांपेक्षा जास्त काळ नॉनस्टिक भांडे मोठ्या आचेवर ठेवू नये असं सांगितलं जातं.
नॉनस्टिक भांडे वापरताना ते खरचटून त्यावरचं कोटिंग निघू नये म्हणून लाकडाचे किंवा प्लॅस्टिकचे चमचे वापरले जातात. पण हे चमचे सारखे स्वयंपाकासाठी वापरले आणि ते व्यवस्थित स्वच्छ केले नाहीत तर मात्र अस्वच्छतेमुळे या चमच्यांमुळेही जंतूसंसर्ग होतो.
त्यामुळे अ‍ॅल्युमिनियमला उत्तम पर्याय म्हणजे लोखडी कढया आणि तवे. स्टीलची भांडी आणि चमचे. या अशा भांड्याद्वारे आपण आपल्या रोजच्या आयुष्यातून आपल्या पोटात अन्नाद्वारे जाणारा विषप्रवेश नक्कीच रोखू शकतो.

Web Title: The truth about the aluminum rust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.