यंदाच्या पावसाळ्यात भज्यांचे हे 7 प्रकार ट्राय करून बघा. पावसासोबतच ही भजीही तुम्हाला त्यांच्या प्रेमात पाडतील!
By admin | Published: June 8, 2017 06:04 PM2017-06-08T18:04:32+5:302017-06-08T18:04:32+5:30
पावसाळा, चहा आणि भजी हे समीकरण पुढील अरबो नाही तर खरबो वर्षं तरी कोणीही बदलू शकणार नाही. पण एक आहे भजीचे प्रकार आपण नक्कीच बदलू शकतो
- सारिका पूरकर -गुजराथी
मान्सूनपूर्व पावसानं सर्वत्र हजेरी लावलीय. लवकरच मान्सूनही बरसणार आहे. धो-धो, मुसळधार, रिमझिम अशा सर्वच रुपात तो बरसणार आहे. रवीराजाच्या प्रकोपामुळे अंगाची काहिली होत असताना या पावसाने सारे काही थंडगार, आल्हाददायक होऊन जाणार आहे. करपलेल्या रोपांऐवजी हिरवीगार, वाऱ्यावर डोलणारी रोपे, शेते दिसू लागणार आहे. अवघी सृष्टीच पाऊस पिऊन ताजीतवानी होऊन जाणार आहे. गवताच्या पात्यांवर, अळवाच्या पानांवर, पक्ष्यांच्या पंखांवर, सिमेंटच्या पत्र्यांवर, मातीच्या कौलांवर हा पाऊस थुईथुई नाचणार आहे. मग तना-मनाला बेधुंद करणाऱ्या अशा पावसात खिडकीत बसून पाऊस न्याहाळताना हातात वाफाळता आलं घातलेल्या चहाचा कप आणि जोडीला गरमागरम, कुरकुरीत, खुसखुशीत भज्यांची प्लेट ती तर हवीच! पावसाळा, चहा आणि भजी हे समीकरण पुढील अरबो नाही तर खरबो वर्षं तरी कोणीही बदलू शकणार नाही. पण एक आहे भजीचे प्रकार आपण नक्कीच बदलू शकतो आणि पाऊस आणि भजी हे समीकरण आणखी इंटरेस्टिंग करू शकतो.
७) शेपूची भजी
एरवी पालकाची भजी आपण नेहमीच खातो. परंतु, शेपूच्या भाजीची भजी करता येतात. हे माहितही नसेल अनेकांना. हा भज्यांचा प्रकार गुजराती बांधवांमध्ये आवडीनं खाल्ला जातो. बेसन, तांदळाचे पीठ, तीळ, गरम मसाला, बडीशेपची पावडर,धन-जिरे पावडर, मीठ, हळद-तिखट, बारीक चिरलेला कांदा आणि शेपूची चिरलेली भाजी घालून हे मिश्रण बनवतात आणि भजी काढली जातात. वेगळ्या चवीची आणि काहीशी दुर्लक्षित, नाकं मुरडल्या जाणाऱ्या शेपूला आपलंसं करायला लावणारी ही भजी आहेत. या जोडीला स्वीट कॉर्न-चीज, गोभी, भेंडी, कारले अशा विविध भाज्या वापरून तसेच ज्वारी, गव्हाचं पीठ वापरुनही अनेक पौष्टिक भज्यांची चव घरबसल्या चाखता येऊ शकते. यंदा बरसणाऱ्या प्रत्येक पावसात ही वेगवेगळी भजी नक्की ट्राय करून बघा!