अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी नुकसानकारक ठरतं हळदीचं दूध, जाणून घ्या कुणी टाळावं!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 10:48 AM2024-10-24T10:48:54+5:302024-10-24T11:11:44+5:30
Haldi Doodh Side Effects : अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी हळदीचं दूध नुकसानकारक ठरू शकतं. अशात कुणी हळदीच्या दुधाचं सेवन करू नये हे जाणून घेऊ.
Haldi Doodh Side Effects : सर्दी-खोकला असो वा एखादी जखम लागली असो, शरीरात वेदना होत असो बरेच लोक रात्री झोपताना एक ग्लास हळदीचं दूध पितात. डॉक्टरही हळदीचं दूध पिण्याचा सल्ला देत असतात. हळदीमध्ये आढळणारे अॅंटी-बॅक्टेरिअल गुण दुधासोबत मिळून शरीराला खूप फायदे देतात. हेच कारण आहे की, फार पूर्वीपासून अनेक समस्या दूर करण्यासाठी हळदीच्या दुधाचं सेवन केलं जातं. पण अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी हळदीचं दूध नुकसानकारक ठरू शकतं. अशात कुणी हळदीच्या दुधाचं सेवन करू नये हे जाणून घेऊ.
कुणी टाळावं हळदीच्या दुधाचं सेवन?
लिव्हरसंबंधी समस्या असेल तर...
हळदीचं दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. हिवाळ्यात तर याचं भरपूर सेवन केलं जां. पण ज्या लोकांना लिव्हरसंबंधी समस्या आहे, त्यांच्यासाठी हे दूध नुकसानकारक ठरू शकतं. हळदीमध्ये करक्यूमिन तत्व आढळतं. जे लिव्हरसाठी नुकसानकारक असतं. अशात ज्या लोकांना लिव्हरसंबंधी समस्या आहे त्यांनी याचं सेवन टाळलं पाहिजे. त्याशिवाय ज्यांना अॅसिडिटी आणि जुलाब आहेत त्यांनीही हळदीच्या दुधाचं सेवन करू नये.
उलटी, जुलाब आणि मळमळ
हळदीमध्ये आढळणाऱ्या करक्यूमिन तत्व आढळतं. त्यामुळे जे लोक रोज हळदीच्या दुधाचं सेवन करतात त्यांना जुलाब, उलटीची समस्या होऊ शकते. या दुधाचं रोज आणि जास्त प्रमाणात सेवन करू नये.
आयर्नची कमतरता असेल तर...
रोज हळदीच्या दुधाचं सेवन केल्याने शरीरात आयर्नची कमतरता होऊ शकते. कारण हळदीमध्ये आढळणारे तत्व आयर्नच्या अवशोषणात अडथळा निर्माण करतात. याच कारणाने रोज हळदीचं दूध पिणाऱ्या व्यक्तींना आयर्नच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो.