घरच्याघरी च्यवनप्राश करायचाय? मग या दोन पध्दतीपैकी एक पध्दत निवडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 06:12 PM2017-11-29T18:12:07+5:302017-11-29T18:18:07+5:30

बाजारात विविध ब्रॅण्ड्सचे च्यवनप्राश चकाचक पॅकिंगमध्ये मिळतात. ते न आणता घरीच सहजसोप्या पद्धतीनं च्यवनप्राश बनवून पाहा. च्यवनप्राशमध्ये विविधप्रकारच्या औषधी घटकांचा समावेश असतो. आपण मात्र जी उपलब्ध होतील ते वापरून च्यवनप्राश घरीच तयार करु शकतो. च्यवनप्राश तयार करण्याच्या दोन सोप्या पध्दती आहेत.

Two easy tricks for homemade chavanprash | घरच्याघरी च्यवनप्राश करायचाय? मग या दोन पध्दतीपैकी एक पध्दत निवडा!

घरच्याघरी च्यवनप्राश करायचाय? मग या दोन पध्दतीपैकी एक पध्दत निवडा!

googlenewsNext
ठळक मुद्दे* हिवाळ्यात भरपूर प्रमाणात मिळणा-या आवळ्यापासून मुरंबा तयार करण्याची परंपरा भारतात आढळते. तसे आवळ्यापासून विविध पदार्थ बनतात. परंतु, आरोग्य संवर्धनासाठी परिपूर्ण पदार्थ म्हणजे च्यवनप्राश.* धकाधकीच्या जीवनात नाश्ता, जेवण यासाठी पुरेसा वेळ देता येत नसल्यामुळे विविध आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. त्याचा सामना करत असाल तर पहिल्यांदा च्यवनप्राश खाणं सुरु करा.




- सारिका पूरकर गुजराथी



थंडी सुरु होताच घराघरात पौष्टिक पदार्थांचा रतीब सुरु होतो. खारीक-खोब-याच्या लाडवांबरोबरच बाजारात मिळणा-या गाजर, हरभरे, मटार, मुळा, बीट, आवळे यांचे अनेक नवनवीन प्रयोग सुरु असतात.

यात आवळ्यावरचे प्रयोग अतिशय महत्त्वाचे. कारण आवळ्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. संपूर्ण आरोग्याच्या दृष्टीनं आवळा वरदान आहे. लोह, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, कॅल्शिअम, बी कॉम्प्लेक्स हे सर्व आवळ्यात ठासून भरलेलं आहे. म्हणूनच डोळे, केस, पोट , हाडे यांच्या निरोगी आरोग्यासाठी आवळा नेहमी खायला हवा. म्हणूनच हिवाळ्यात भरपूर प्रमाणात मिळणा-या आवळ्यापासून मुरंबा तयार करण्याची परंपरा भारतात आढळते. तसे आवळ्यापासून विविध पदार्थ बनतात. परंतु, आरोग्य संवर्धनासाठी परिपूर्ण पदार्थ म्हणजे च्यवनप्राश.

 

 

शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवणं, ताण-तणाव कमी करणं, शरीरास ताकद आणि स्फूर्ती प्रदान करणं, हृदयाचं कार्य सुरळीत करणं,रक्त शुुद्ध करणं, पचनक्रिया सुधरवणं, त्वचा आणि केसांचा पोत छान करणं, मेंदूचं कार्य जोमानं सुरु ठेवणं, स्मरणशक्ती वाढवणं ही सर्व कामं च्यवनप्राश करतं. म्हणूनच थंडीच्या दिवसात रोज सकाळी च्यवनप्राश घ्यायलाच हवं.
धकाधकीच्या जीवनात नाश्ता, जेवण यासाठी पुरेसा वेळ देता येत नसल्यामुळे विविध आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. त्याचा सामना करत असाल तर पहिल्यांदा च्यवनप्राश खाणं सुरु करा. आणि हो, बाजारात विविध ब्रॅण्ड्सचे च्यवनप्राश चकाचक पॅकिंगमध्ये मिळतात. ते न आणता घरीच सहजसोप्या पद्धतीनं च्यवनप्राश बनवून पाहा. च्यवनप्राशमध्ये विविधप्रकारच्या औषधी घटकांचा समावेश असतो. आपण मात्र जी उपलब्ध होतील ते वापरून च्यवनप्राश घरीच तयार करु शकतो.

च्यवनप्राश तयार करण्याच्या दोन सोप्या पध्दती आहेत.

 



 

च्यवनप्राश पध्दत 1
साहित्य :- 1 किलो आवळे, 200 ग्रॅम ताजं आलं, 700 ग्रॅम गुळ ( शक्यतो सेंद्रिय घ्या ), 2 मोठी वेलची, 8 वेलदोडे, दालचिनीचा तुकडा, 8 लेंडी पिंपळींचे तुकडे ( काष्ट औषधी दुकानात मिळते ), 2 ग्रॅम प्रवाळभस्म, 50 ग्रॅम गुळवेल सत्वं, 50 ग्रॅम अश्वगंधा सत्वं , 50 ग्रॅम शतावरी , 1 टेबलस्पून काळीमिरी, 1/2 चमचा नागकेशर, 20 लवंगा, 1 ग्रॅम केशर, 1 चमचा वंशलोचन, पाव चमचा जायफळ पावडर आणि 200 ग्रॅम मध.
कृती :- आवळे धुवून वाफवून घ्या. उकडल्यानंतर सोलून त्यातील बिया काढून फोडी करून घ्या. मिक्सरच्या भांड्यात या फोडी वाटून घ्या. आले देखील बारीक किसणीनं किसून घ्या. वर दिलेले सर्व मसाले मिक्सरमधून काढून त्याची पूड करु न घ्या. जाड बुडाच्या भांड्यात आवळ्याचा गर, किसलेलं आलं, गुळ घालून मिश्रण चांगलं आटवून घ्या. मिश्रणानं भांड्याच्या कडा सोडल्या की यात मध घाला. मिश्रण परत चांगलं ढवळा. नंतर मसाल्याची पूड घाला. च्यवनप्राश तयार आहे . थंड झाल्यावर काचेच्या बरणीत भरु न ठेवा. यात साजूक तूप घालून यातली पौष्टिकता आणखी वाढवू शकता.

च्यवनप्राश पध्दत 2

साहित्य :-1 इंच दालचिनी, 1/2 चमचा बडीशेप, 1 चमचा काळिमरी, 5-6 केशराच्या काड्या, 6-8 वेलची, सूंठ पावडर, 3-4 कप आवळे, 2 कप गूळ, साजूक तूप आणि 1 कप मध.
 

कृती :- आवळे वाफवून त्याचा लगदा बनवून घ्या. जाड बुडाच्या भांड्यात साजूक तूप घालून त्यात आवळ्याचा लगदा परतवून घ्या. चांगला परतल्यावर त्यात गुळ घालून मिश्रण पुन्हा एकजीव करु न घ्या. यात आता मध घालून पुन्हा मिक्स करु न घ्या, मिश्रणानं भांड्याच्या कडा सोडल्या की यात सर्व मसाल्यांची पूड घाला. मिक्स करा. गॅस बंद करु न मिश्रण गार होऊ द्या. च्यवनप्राश काचेच्या बरणीत भरु न ठेवा.

Web Title: Two easy tricks for homemade chavanprash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.