जगभरातील सर्वात महागडी फळं; किंमत ऐकून व्हाल हैराण!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 07:25 PM2018-10-22T19:25:47+5:302018-10-22T19:27:27+5:30
सध्या आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर अनेक अशक्य अशा गोष्टी करतो. प्रत्येक क्षेत्रात मानवाने प्रगती केली आहे. त्याचप्रमाणे कृषी क्षेत्रातही मोठी क्रांती झाली असून अनेक नवनवीन प्रयोग करण्यात येत आहेत.
सध्या आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर अनेक अशक्य अशा गोष्टी करतो. प्रत्येक क्षेत्रात मानवाने प्रगती केली आहे. त्याचप्रमाणे कृषी क्षेत्रातही मोठी क्रांती झाली असून अनेक नवनवीन प्रयोग करण्यात येत आहेत. आज जाणून घेऊया जगातील सर्वात महागड्या फळांबाबत. ही फळं आपल्या किंमतीसोबतच त्यांच्या आगळ्या-वेगळ्या आकारासाठीही ओळखली जातात.
1. लंडनमधील Lost Gardens Of Heliganचे अननस
लंडनमध्ये असणाऱ्या एका ठिकाणाचं नाव लॉस्ट गार्डन ऑफ हेलिगन आहे. या ठिकाणी अननसाची शेती करण्यात येते. येथे पिकवण्यात येणारे अननस जगातील सर्वात महाग अननस म्हणून ओळखले जातात.
किंमत - एका अनानासाची कींमत 1600 डॉलर म्हणजेच 1,17,576 रुपये आहे.
2. चीनमधील बुद्धांच्या आकाराची नासपती
बुद्धांच्या आकाराची नासपती चीनमध्ये आढळून येते. ज्यावेळी याची शेती करण्यात येते त्यावेळी त्यावर बुद्धांच्या आकाराची फ्रेम लावण्यात येते. ज्यामुळे नासपतीचा आकार तसा होतो. चीनमध्ये याला जादूचं फळ मानलं जातं. हे फळ सहज उपलब्ध होत नाही.
किंमत - एका नासपतीची किंमत 9 डॉलर म्हणजेच 660 रुपये आहे.
3. जपानची चौकोनी कलिंगडं
जपानमध्ये पिकवण्यात येणारी कलिंगडांचा सर्वात महागड्या फळांमध्ये समावेश होतो. ही इतर कलिंगडांपेक्षा वेगळी ठरण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे यांचा आकार. अतर कलिंगडं गोलाकार असतात परंतु ही कलिंगडं चौकोनी आकाराची असतात. त्यांच्या या आकारामुळे त्यांना एखाद्या ठिकाणी ठेवणं सोपं जातं. तसेच कापून खाणंदेखील सोपं जातं.
किंमत - चौकोनी कलिंगडाची किंमत 800 डॉलर म्हणजे जवळपास 58,872 रुपये आहे.
4. जपानमधील Sembikiya Queen स्ट्रॉबेरी
चवदार आणि रसरशीत स्ट्रॉबेरी सर्वांनाच आवडते. अनेक डेझर्ट्समध्ये आवर्जुन समाविष्ट करण्यात येणाऱ्या स्ट्रॉबेरीचे अनेक फायदे आहेत. साधारणतः स्ट्रॉबेरी शंभर किंवा दोनशे रूपये किलो मिळते. परंतु जपानमध्ये मिळणाऱ्या स्ट्रॉबेरीचे किंमत ऐकून तुम्ही हैराण व्हाल.
किंमत - एका स्ट्रॉबेरीची किंमत 2.75 डॉलर म्हणजेच जवळपास 203 रुपये आहे.
5. जापानचे डेकोपोन साइट्रस
नागपूरची संत्री संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध असली तरीदेखील जपानमध्ये मिळणाऱ्या या संत्र्यांची बात काही औरच आहे. ही जगातील सर्वात महाग संत्री आहेत. या संत्र्यांमध्ये बीया आढळत नाहीत आणि ही चवीलाही गोड लागतात.
किंमत- सहा संत्र्यांची किंमत 80 डॉलर म्हणजेच 5,878 रुपये आहे.