हिवाळ्यात आवर्जून खाव्यात 'या' पौष्टिक भाज्या, अनेक आजारांचा टळेल धोका अन् शरीर राहील फीट!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 11:09 AM2024-11-07T11:09:45+5:302024-11-07T11:13:07+5:30
Winter Vegetables: शरीर आतून गरम ठेवण्यासाठी खाण्या-पिण्याचीही विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. हिवाळ्यात वेगवेगळ्या भाज्या बाजारात मिळतात. ज्यांमध्ये भरपूर पोषक तत्व असतात.
Winter Vegetables: हिवाळ्यात थंडीमुळे इम्यूनिटी पॉवर कमजोर होते. ज्यामुळे लोक सहजपणे आजारी पडतात. सर्दी-खोकला, कफ, ताप या तर कॉमन समस्या आहेत. अशात केवळ गरमागरम चहा किंवा गरम कपडे घालूनच भागत नाही. शरीर आतून गरम ठेवण्यासाठी खाण्या-पिण्याचीही विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. हिवाळ्यात वेगवेगळ्या भाज्या बाजारात मिळतात. ज्यांमध्ये भरपूर पोषक तत्व असतात. या भाज्यांचं सेवन करून तुम्ही हिवाळ्यात अनेक आजारांपासून बचाव करू शकता. कारण या भाज्यांच्या सेवनाने इम्यूनिटी बूस्ट होते. अशात तुम्हाला इन्फेक्शनचा धोका कमी राहतो.
कोणत्या भाज्यांचं करावं सेवन?
१) मेथी
हिवाळ्यात मेथीची हिरवी भाजी भरपूर मिळते. या भाजीचा तुम्ही आहारात समावेश करू शकता. मेथी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. मेथीमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्स गुण भरपूर असतात, तसेच यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, फायबर असेही पोषक तत्व असतात. जे शरीर निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात.
२) पालक
पालक तर पोषक तत्वांची खजिना असलेली पालेभाजी आहे. हिवाळ्यात पालकचं सेवन केल्याने आरोग्यासंबंधी अनेक समस्यांपासून बचाव केला जाऊ शकतो. यात आयर्न, पोटॅशिअम, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि इतरही अनेक पोषक तत्व असतात. जे अनेक आजार दूर करण्यास मदत करतात. यातील व्हिटॅमिन सी मुळे इम्यूनिटी बूस्ट होण्यास मदत मिळते.
३) मूळा
हिवाळ्यात मूळा खाण्याचेही आरोग्याला अनेक फायदे मिळतात. तुम्ही याचा आहारात वेगवेगळ्या पद्धतीने समावेश करू शकता. या दिवसांमध्ये मूळ्याचे पराठे भरपूर खाल्ले जातात. तसेच तुम्ही मूळा सलाद म्हणूनही खाऊ शकता. एक्सपर्टनुसार, मूळ्यातील व्हिटॅमिन सी, फोलिक, ऐंथोसायनिनने अनेक आजारांचा धोका कमी होतो.
४) गाजर
हिवाळ्यात लोक गाजराचं भरपूर सेवन करतात. गाजर खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. यात आयर्न, पोटॅशिअम, कॉपर, मॅगनीजसारखे पोषक तत्व असतात. या पोषक तत्वांमुळे अनेक आजारांपासून बचाव होतो. गाजरातील व्हिटॅमिन्सनुळे इम्यूनिटीही सुद्धा मजबूत होते, सोबतच डोळ्यांसाठीही गाजर खूप फायदेशीर असतं.
५) ब्रोकली
ब्रोकलीचं सेवन तुम्ही केवळ हिवाळ्यातच नाही तर कोणत्याही ऋतुमध्ये केलं पाहिजे. यात बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, झिंक आणि सेलेनियम भरपूर असतात. या भाजीचं सेवन केल्याने वातावरण बदलामुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव होण्यास मदत मिळते. तसेच याने तुम्हाला वजन कमी करण्यासही मदत मिळते.