अंडे का व्हेज फंडा! आता लवकर तुमच्या प्लेटमध्ये दिसतील शाकाहारी अंडी!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 11:18 AM2019-05-18T11:18:49+5:302019-05-18T11:22:02+5:30
एग व्हाइट म्हणजेच अंड्याचा पांढरा भाग हा जगभरात प्रोटीनचा सर्वात चांगला आणि हेल्दी स्त्रोत मानतात.
एग व्हाइट म्हणजेच अंड्याचा पांढरा भाग हा जगभरात प्रोटीनचा सर्वात चांगला आणि हेल्दी स्त्रोत मानतात. पण अंडी कोंबड्यांची असल्याने जास्तीत जास्त लोक त्यांना मांसाहार समजतात. त्यामुळे अनेकजण अंडी खात नाहीत. कारण त्यांना अॅनिमल वेलफेअरची चिंता असते. किंवा एक साधं कारण असतं की, तुम्ही शाकाहारी आहात आणि तुमच्यासाठी अंडी मांसाहार आहे. पण आता या समस्या दूर करण्यासाठी झांडांपासून अंडी तयार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
अंड्याच्या पर्यायांची बाजारात वेगाने वाढ होत आहे. तरी सुद्धा अंडी बाजारातून दूर करणे सोपं नाही. एग व्हाइट म्हणजेच अंड्यांच्या पांढऱ्या भागाची तुलना जेव्हा whey, soy आणि pea म्हणजेट मट्ठा, सोया आणि मटरसोबत केली जाते, तेव्हा अंड्यांचा पांढरा भाग हा प्रोटीनचं सर्वात चांगलं साधन म्हणून समोर येतं. जास्तीत जास्त फूड कंपन्याही अंड्यांवरच विश्वास ठेवतात. कारण त्याकडे नॅच्युरल प्रोटीन म्हणूण पाहिलं जातं. सोबतच त्याला कोणताही फ्लेवर नसतो.
मूगापासून तयार लिक्विड एग सब्सिट्यूट
नॉन एग क्षेत्रात एका मोठ्या कंपनीने गेल्यावर्षी त्यांच्या लिक्विड एग सब्सिट्यूट लॉन्च केलं होतं. जे पूर्णपणे मूगापासून तयार प्रोटीनपासून तयार करण्यात आलं होतं. कंपनीने दावा केला होता की, त्यांनी या प्लांट बेस्ड लिक्विड एग सब्सिट्यूटची अमेरिकेत चांगली विक्री केली आहे. तरी सुद्धा अजून मोठा पल्ला गाठायचा आहे.
अंड्यांना रिप्लेस करण्याचे अनेक पर्याय
प्लांट बेस्ड फूड्स असोसिएशनच्या कार्यकारी निर्देशिका मिशेल सिमन म्हणाल्या की, 'फूल सप्लायमध्ये ग्राहकांना न सांगता अंडी रिप्लेस करण्याच्या अनेक पद्धती आहेत. अनेक लोकांना या गोष्टीने काहीही फरक पडत नाही की, त्यांच्या केकमध्ये अंड आहे किंवा नाही. त्यांना केवळ त्यांचा केक चांगला हवा असतो. तुम्ही तयार प्रॉडक्टमध्ये काहीही बदल केला तरी सुद्धा ग्राहक कदाचित नोटिसही करणार नाहीत'.