पुडिंग, कस्टर्ड, मफिन्स स्वत: तयार करा, यात अवघड काहीच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 05:55 PM2017-12-28T17:55:28+5:302017-12-28T18:02:58+5:30

ख्रिसमसनिमित्त खूप वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ केले जातात. पुडिंग, कस्टर्ड आणि मफिन्स हे पदार्थ तर एकदम मस्ट आहे. अर्थात हे पदार्थ नुसते ख्रिसमसचे नसून न्यू इअर सेलिब्रेशनचेही आहे. यंदाच्या न्यू इअर सेलिब्रेशनला यातलं काही करायचं का आपल्या स्वत:च्या हातानं?

Very easy to make Pudding, custard, muffins ! | पुडिंग, कस्टर्ड, मफिन्स स्वत: तयार करा, यात अवघड काहीच नाही!

पुडिंग, कस्टर्ड, मफिन्स स्वत: तयार करा, यात अवघड काहीच नाही!

googlenewsNext
ठळक मुद्दे* भरपूर सुकेमेवा घातलेले ख्रिसमस पुडिंग ख्रिमसचा आनंद ख-या अर्थानं द्विगुणित करतं.* अ‍ॅपल कस्टर्ड हे एक अत्यंत हेल्दी आणि करायला सोपे असे डेझर्ट आहे.* चॉकलेट पुडिंग हे झटपट होणारे असल्यामुळे पाहुण्यांना देण्यासाठी हा पर्याय उत्तम ठरतो.




- सारिका पूरकर-गुजराथी



ख्रिसमस आणि न्यू इअर सेलिब्रेशन म्हटलं की खाबूगिरीची यादी फक्त केकच्या प्रकारांवरच संपत नाही. खरंतर ख्रिसमसनिमित्त खूप वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ केले जातात. पुडिंग, कस्टर्ड आणि मफिन्स हे पदार्थ तर एकदम मस्ट आहे. अर्थात हे पदार्थ नुसते ख्रिसमसचे नसून न्यू इअर सेलिब्रेशनचेही आहे. मस्त चवीची मेजवानी देणारे हे पदार्थ न्यू इअर सेलिब्रेशनच्या पार्टीत ठेवायचे असतील तर जरूर ठेवता येण्यासारखे आहेत. त्यासाठी बाहेर आॅर्डर देण्याची गरज तर अजिबात नाही. हे पदार्थ दुकानात मिळत असले आणि एरवीही ते बाहेरूनच आणले जात असले तरी यंदाच्या सेलिब्रेशनसाठी घरच्या घरी हे टार्गेट ठेवायलाच हवं. कारण हे पदार्थ सहज जमण्यासारखे आहेत.
पार्टीत सर्वच काही विकतच ठेवण्यापेक्षा पुडींग, कस्टर्ड, मफिन्स सारखा विशेष पदार्थ खास आपल्या हातानं बनवलेला असेल तर सेलिब्रेशनचा उत्साह आणि आनंद नक्कीच वाढतो.

1) ब्रेड-बटर पुडिंग :- पुडिंग हा देखील ख्रिश्चन बांधवांच्या खाद्य संस्कृतीतील प्रमुख पदार्थ आहे. असंख्य प्रकारचे पुडिंग ते बनवतात. मात्र पुडिंगचा हा प्रकार पारंपरिक आणि खास ख्रिसमसनिमित्त केला जाणारा आहे. ब्राऊन ब्रेडचे तुकडे करु न त्यात वाळलेली फळं , मनुके, किशमिश, चॉकलेट चिप्स, टूटी-फ्रुटी, मिक्स हर्ब्ज आणि दूध घालून हे पदार्थ चांगले एकत्र केले जातात. यात नंतर ब्राऊन शुगर, अंडे, लिंबाची किसलेली साल हे सर्व साहित्य एकत्र करून दुधात ब्रेड भिजू दिला जातो. शेवटी बटर वितळवून या मिश्रणात घालून मिश्रण बेक केलं जातं. क्रीम अथवा कस्टर्डबरोबर हे पुडिंग सर्व्ह केलं जातं.

 

2) ख्रिसमस पुडिंग :-भरपूर सुकेमेवे घातलेले हे पुडिंग ख्रिमसचा आनंद ख-या अर्थाने द्विगुणित करते. बटर-साखर चांगले फेटून त्यात व्हॅनिला इसेन्स घातलं जातं. दुसरीकडे साखरेच्या पाकात घोळवून वाळवेल्या फळांच्या साली ( संत्री आणि इतर फळे ), बदाम, काजू, मनुके, अक्रोड यांचे तुकडे तसेच चेरी, गाजराचा किस, सफरचंदाचे तुकडे, दुधात भिजत घातले जातात. मैद्यात दालचिनी पावडर, बेकिंग सोडा, मीठ आणि जायफळ पावडर घालून तो चाळून घेतला जातो. नंतर वरचे दूध मिश्रणआणि ब्राऊन शुगर मैद्यात घातलं जातं. अंडं फोडून, फेटून यात घालून हे मिश्रण वाफवलं जातं. कस्टर्डबरोबर किंवा बटरस्कॉच सॉसबरोबर ते सर्व्ह केलं जातं.

 

 

3) अ‍ॅपल कस्टर्ड :- एक अत्यंत हेल्दी आणि करायला सोपे असे हे ख्रिसमस डेझर्ट आहे. दूध उकळत ठेवून पाव वाटी दुधात कस्टर्ड पावडर प्रमाणात मिक्स करून घेतली जाते. दूध उकळलं की त्यात कस्टर्ड घालून मिक्स केलं जातं. यातच मग साखर घालून चांगलं मिक्स करून थंड करून फ्रीजमध्ये सेट केलं जातं. या मिश्रणात नंतर सफरचंदाचे तुकडे आणि सुकेमेवे घालून सर्व्ह केलं जातं. हे कस्टर्ड चिल्ड असायला हवं यात शंका नाही.

 

 

4) चॉकलेट पुडिंग :- हे पुडिंग तर असं आहे की हे आवडत नाही असे कोणी म्हणणारा सापडणार नाही. पाण्यात जिलेटीन विरघळवून घेतलं जातं. नंतर कोको पावडर, दूध, व्हॅनिला इसेन्स, साखर एकत्र करून हलकंसं गरम करून त्यात जिलेटीन घालून हे मिश्रण पुन्हा वाफवलं जातं. मिश्रण वाफवून गार झाल्यानंतर फ्रीजमध्ये सेट करु न चेरी, क्र ीमबरोबर सर्व्ह केलं जातं.झटपट होणारे असल्यामुळे पाहुण्यांना देण्यासाठी हा पर्याय उत्तम ठरतो.

 

5) बनाना मफिन्स:- केळ्याचे पौष्टिक तत्वं आपल्याला माहितच आहे. ख्रिसमस पार्टीसाठीही हेल्दी बेकिंग करायचे असेल तर हे मफिन्स हमखास केले जातात. केळं चांगले कुस्करून त्यात बटर घालून फेसलं की त्यात साखर, व्हॅनिला इसेन्स, अंडी घालून पुन्हा चांगलं मिक्स करु न त्यात मैदा, बेकिंग सोडा, अक्र ोडचे तुकडे घालून हे मिश्रण कपकेक मध्ये घालून मफिन्स बेक केले जातात.

Web Title: Very easy to make Pudding, custard, muffins !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.