भारतात फक्त विराटच्याच रेस्टॉरंटमध्ये मिळतात 'या' डिशेस; खाद्यप्रेमी मारतात ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 07:15 PM2019-01-07T19:15:30+5:302019-01-07T19:19:46+5:30
भारतीय क्रिकेट टिमचा कर्णधार आणि धडाकेबाज बॅट्समन विराट कोहलीची खरी ओळखं क्रिकेटपटू म्हणून आहे. परंतु याव्यतिक्तही विराटचे व्यवसाय आहेत. विराटचा स्वतःचा एक फॅशन ब्रँड असून तो एका रेस्टॉरंटचा मालकही आहे.
भारतीय क्रिकेट टिमचा कर्णधार आणि धडाकेबाज बॅट्समन विराट कोहलीची खरी ओळखं क्रिकेटपटू म्हणून आहे. परंतु याव्यतिक्तही विराटचे व्यवसाय आहेत. विराटचा स्वतःचा एक फॅशन ब्रँड असून तो एका रेस्टॉरंटचा मालकही आहे. देशाच्या राजधानीचं ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिल्लीमध्ये विराटचं 'नुएवा' (Nueva) हे रेस्टॉरंट आहे. साधारणतः दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या रेस्टोरेंटने आपली खास सर्विस आणि अप्रतिम डिशेजच्या जोरावर अल्पावधीच या रेस्टॉरंटने खाद्यप्रेमींच्या हृदयात स्थान मिळवलं आहे. असं म्हणतात की, लोकांच्या हृदयापर्यत जाण्याचा मार्ग हा त्यांच्या पोटापासून जातो. कदाचित हेच गुपित असावं विराटच्या रेस्टॉरंटमध्ये होणाऱ्या गर्दीमागील.
दिल्ली 'नुएवा'मधील पदार्थांची चव फक्त भारतीयांमध्येच नाही तर परदेशी नागरिकांच्याही जीभेवर रेंगाळली आहे. या रेस्टॉरंटमध्ये साउथ अमेरिकन पदार्थांसह विविध देशांमधील चवी चाखायला मिळतात. या रेस्टॉरंटचं वैशिष्ट्य म्हणजे, येथे तुम्हाला अशा एका हटके डिशची चव चाखायला मिळेल जी संपूर्ण भारतात फक्त 'नुएवा'मध्येच तयार करण्यात येते.
1. विराटने सुरू केलेलं हे हॉटेल देशातील पहिलं तापस रेस्टोरेंट आहे. 'तापस' एक साउथ अमेरिकन पदार्थ असून हा पदार्थ तयार करण्यासाठी स्पॅनिश, फ्रेंच, आशिआई आणि जपानी फ्लेवर्सचा वापर करण्यात येतो. हा पदार्थ मशरूम आणि चीझचा वापर करून तयार करण्यात येतो. तसेच कोथिंबीर सालसा, केळ्याचे चिप्स, कीवी, कैरी, ओलियो पास्ता, फिश आणि स्पेशल बटर सॉससोबत सर्व्ह केली जाते. याव्यतिरिक्त तुम्ही येथे चहा आणि चिकनसोबत व्हॅनिला सॉस कॉम्बिनेशनचाही आस्वाद घेवू शकता. तसेच येथे मिळणारी लासंगाही खवय्यांमध्ये प्रसिद्ध आहे. हा पदार्थ तयार करण्यासाठी रेग्युलर पास्त्याऐवजी तोरीचा वापर केला जातो.
2. 'नुएवा'मध्ये तुम्हाला चीफ मायकल स्वामी यांच्या फेमस डिशचीही चव चाखायला मिळेल. मायकल स्वामी एक प्रसिद्ध शेफ, फूड स्टायलिस्ट, लेखक आणि ट्रॅव्हल फोटोग्राफर आहेत. तसेच मायकल यांचा समावेश भारतातील टॉप 50 शेफ्समध्ये करण्यात येतो.
3. कोणत्याही रेस्टॉरंटला तेथील एम्बिएन्स आणि पदार्थांवरून जज करण्यात येतं. नुएवाचं एम्बिएन्स प्रचंड खास आहे. या रेस्टॉरंटचं दोन भागांमध्ये विभाजन करण्यात आलं आहे. ग्राउंड फ्लोरला बार किंवा एखाद्या लाउंजप्रमाणे तयार करण्यात आलं आहे. जिथए तुम्ही मित्र-मैत्रिणींसोबत एन्जॉय करू शकता.
4. या रेस्टॉरंटला भेट देण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे विराट कोहली. तुम्ही क्रिकेटचे शौकिन अशाल आणि विराट कोहली तुमचा आवडता खेळाडू असेल तर तुम्ही या रेस्टॉरंटला अवश्य भेट देणं गरजेचं आहे. कुणास ठाऊक कधी इथे तुमची आणि विराटची भेट होईल.
कुठे आहे हे रेस्टॉरंट :
विराट कोहलीचं हे रेस्टॉरंट साउथ दिल्लीतील आरके पुरम, सेक्टर 9 मध्ये आहे आणि याची वेळ सकाळी 11 ते रात्री 12.30 पर्यंत आहे. या रेस्टॉरंटच्या मेन्यूमध्ये इतरही अनेक देशी-विदेशी पदार्थांचा समावेश करण्यात आलेला आहे.