दररोज प्या मँगो मिल्कशेक; चवीसोबतच आरोग्यासाठीही ठरतो खास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 06:44 PM2019-05-17T18:44:12+5:302019-05-17T18:48:32+5:30

सध्या आंब्याचं सीझन सुरू असून बाजारातही आंब्यांची आवाक् वाढली आहे. आपल्यापैकी कदाचितच कोणी असेल ज्यांना आंबा आवडत नाही. आंबा प्रत्येकाच भूरळ घालतो.

Wants to take the benefits of health with the taste then drink daily mango milk shake | दररोज प्या मँगो मिल्कशेक; चवीसोबतच आरोग्यासाठीही ठरतो खास

दररोज प्या मँगो मिल्कशेक; चवीसोबतच आरोग्यासाठीही ठरतो खास

Next

सध्या आंब्याचं सीझन सुरू असून बाजारातही आंब्यांची आवाक् वाढली आहे. आपल्यापैकी कदाचितच कोणी असेल ज्यांना आंबा आवडत नाही. आंबा प्रत्येकाच भूरळ घालतो. एवढचं नाही तर आपल्यापैकी प्रत्येकजण आब्यांची आतुरतेने वाट पाहत असतात. चवीला उत्तम असणारा हा फळांचा राजा आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरतो. यामध्ये व्हिटॅमिन आणि फायबर शरीराला उन्हाळ्यात होणाऱ्या समस्यांपासून लढण्यासाठी मदत करतात. लहान मुलांसाठी आंबा फायदेशीर ठरतो. या सीझनमध्ये आंब्यापासून तयार करण्यात येणाऱ्या पदार्थांची रेलचेल असते. अशातच आपल्यापैकी प्रत्येकाच्याच घरात आंब्यापासून तयार करण्यात येणारा पदार्थ म्हणजे, मँगो मिल्क शेक. फक्त आंबाच नाही तर आंब्यापासून तयार करण्यात येणार मँगो मिल्कशेकही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. जाणून घेऊया मँगो मिल्कशेकच्या आरोग्यदायी फायद्यांबाबत...

कॅलरीजचा भांडार असतो 

मँगो मिल्कशेक आंब्याचा पल्प, दूध आणि साखर एकत्र तयार केला जातो. त्यामुळे या पदार्थांमध्ये कॅलरीज मुबलक प्रमाणात असतात. एक ग्लास मँगो शेकमध्ये 240 कॅलरीज असतात. पण जर यामध्ये साखर एकत्र केली नाही आणि फक्त आंब्याचा नैसर्गिक गोडवाच कायम ठेवला तर एक ग्लास मँगो शेकमध्ये 171 कॅलरीज असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार कॅलरीज वाढवू शकता किंवा कमी करू शकता. 

झटपट एनर्जी मिळते

मँगो शेकमध्ये मुबलक प्रमाणात नैसर्गिक ग्लूकोज असतं. त्यामुळे याला प्यायल्यानंतर शरीराला लगेच ऊर्जा मिळते. याव्यतिरिक्त एक ग्लास मँगो मिल्कशेकमध्ये 16.5 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 8.6 ग्रॅम फॅट्स, 7 ग्रॅम प्रोटीन आढळून येतात.

 ही आहे योग्य वेळ

मँगो मिल्कशेक जेवल्यानंतर पिण्यापेक्षा उत्तम आहे की, हे सकाळी ब्रेकफास्टमध्ये किंवा संध्याकाळी पिणं फायदेशीर ठरतं. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे लवकर वजन वाढवायचं असेल तर जास्त मँगो मिल्कशेक पिऊ नका. कारण यामुळे पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. एका दिवसात जास्त मँगो मिल्कशेक पिऊ नका. 

व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात
 
आंबे आपल्या डोळ्यांसाठी अत्यंत गुणकारी ठरतं. आंब्यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन ए असतं जे डोळ्यांचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतं. व्हिटॅमिन ए डोळ्यांची दृष्टी वाढवतं. जर तुम्ही दररोज एक ग्ला मँगो मिल्कशेक प्यायलात तर डोळ्यांच्या सर्व समस्या दूर होतात. 

शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी 

तुम्ही दररोज 1 ग्लास मँगो मिल्कशेक पित असाल तर मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी, ए, बी, फायबर, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम मिळतं. याव्यतिरिक्त दररोज एका आंब्याचे सेवन केल्याने लाल रक्तपेशींची संख्या वाढते. 

पचनक्रिया उत्तम राहण्यासाठी 

आंब्यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर आढळतं, जे बद्धकोष्ट दूर करण्यासाठी आणि आरोग्य राखण्यासाठी मदत करतं. जर तुम्हाला पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर आंब्याचं सेवन करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरतं. पण जास्त सेवन केल्यामुळे पोटाच्या समस्याही उद्भवू शकतात. 

त्वचेसाठी फायदेशीर 

आंब्यामध्ये मुबलक प्रमाणात बीटा कॅरोटीन तत्व आढळून येतं. जे व्हिटॅमिन एचं रूपांतर अशा पोषक तत्वांमध्ये करतं, जे त्वचेचा अॅक्नेपासून बचाव करतं. तसेच त्वचा तजेलदार करण्यासाठीही मदत करतं. यामध्ये आढळून येणारे व्हिटॅमिन ई फअरी रॅडिकल्स दूर करण्यासाठी आणि त्वचेचं तारूण्य टिकवण्यासाठी मदत करतं. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: Wants to take the benefits of health with the taste then drink daily mango milk shake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.