विविध चवींची पाणीपुरी तीही घरच्याघरी!
By admin | Published: April 27, 2017 05:53 PM2017-04-27T17:53:00+5:302017-04-27T18:00:34+5:30
मुलांना अतिशय आवडणाऱ्या पाणीपुरीला हेल्थी टच देवून पाणीपुरीची मुलांची हौस घरच्याघरी भागवता येते.
सारिका पूरकर-गुजराथी
मुलांना सुट्टी लागल्यामुळे घराघरांमध्ये नुसता दंगा मस्ती आणि कल्लोळ असेल. दर तासा दोन तासांनी आई आम्हाला अमुक हवं अशा फर्माइशी असतील. जे हवं ते यम्मी आणि चटपटीतच असायला हवं हा सर्वच मुलांचा हट्ट. आता मुलांना चटपटीत आवडतं म्हणून त्यांना सारखी बाहेरची पाणीपुरी, भेळपुरी, पॅटिस देवून कसं चालेल. पण खरंतर मुलांना अतिशय आवडणाऱ्या पाणीपुरीला हेल्थी टच देवून पाणीपुरीची मुलांची हौस घरच्याघरी भागवता येते.
* फ्रूटी पाणीपुरी
सध्या बाजारात कलिंगड, संत्री द्राक्षं अन डाळिंबं भरपूर आली आहेत. एका भांडयात थोडा कलिंगडाचा, संत्र्याचा आणि द्राक्षांचा ज्यूस घ्या. त्यात थोडी साखर, काळेमीठ, मिरीपावडर, चाट मसाला, पाणीपुरी मसाला अन कोथिंबीर घाला. ते थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवा. नंतर पाणीपुरीच्या पुरीत हे फळांचं पाणी भरा. त्यात चण्यांऐवजी डाळिंबाचे दाणे घाला. वरुन बारीक शेव भुरभुरा. सफरचंदाच्या, आंब्याच्या फोडीही तुम्ही घालू शकता. एकदम हेल्दी फ्रूट पाणीपुरी तय्यार. एरवी फ्रूट्स म्हटले की मुलं नाकं मुरडतात. फ्रूटी पाणीपुरी हा त्यावरचा रामबाण उपाय आहे.