वेट लॉस रेसिपी : बॉडी डिटॉक्स करण्यासोबतच वजन कमी करतो जलजीरा; असा करा वापर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 03:25 PM2019-04-13T15:25:37+5:302019-04-13T15:30:02+5:30

उन्हाळ्यामध्ये अस्वस्थ करणाऱ्या उन्हातून घरी परतल्यावर शरीराला थंडावा देण्यासाठी प्रत्येकजण काहीना काही शोधत असतो. अनेकजण आपली ही हौस थंड पाण्यावरच भागवतात.

Weight loss recipe jaljeera detox your body and help in reducing weight know its recipes and benefits | वेट लॉस रेसिपी : बॉडी डिटॉक्स करण्यासोबतच वजन कमी करतो जलजीरा; असा करा वापर 

वेट लॉस रेसिपी : बॉडी डिटॉक्स करण्यासोबतच वजन कमी करतो जलजीरा; असा करा वापर 

उन्हाळ्यामध्ये अस्वस्थ करणाऱ्या उन्हातून घरी परतल्यावर शरीराला थंडावा देण्यासाठी प्रत्येकजण काहीना काही शोधत असतो. अनेकजण आपली ही हौस थंड पाण्यावरच भागवतात. पण पाण्याऐवजी जर एखादं थंड आणि आरोग्यासाठी लाभदायक ठरणारं पेय मिळालं तर बात काही औरच... अशातच अनेकदा घरातील थोरामोठ्यांकडूनही जलजीरा पिण्याचा सल्ला देण्यात येतो. अनेक भारतीय पारंपारिक मसाल्यांचा वापर करून जलजीरा तयार करण्यात येतो. हा चटपटीत जलजीरा फक्त तुमच्या जीभेची चव बदलण्यासाठी आणि शरीराला थंडावा देण्यासाठीच नाही तर वजन कमी करण्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरतो. जाणून घेऊया उन्हाळ्यासाठी स्पेशल जलजीरा तयार करण्याची कृती...

(Image Credit : Pure Indian Foods)

असा तयार करा स्पेशल जलजीरा :

  • एक ग्लास थंड पाणी
  • पुदिना आणि कोथिंबीरीची ताजी पानं वाटून त्यामध्ये पाणी एकत्र करा
  • या पाण्यामध्ये चवीनुसार, भाजलेली जीऱ्याची पूड, काळं मीठ, आमचूर पावडर आणि साखर एकत्र करा.
  • तयार मिश्रणामध्ये लिंबाचा रस एकत्र करा
  • सर्व पदार्थ एकत्र करा. तुमचा स्पेशल जलजीरा तयार आहे. 

 

बॉडी हायड्रेट ठेवण्यासाठी 

उन्हाळ्यामध्ये सर्वांना भेडसावणारी समस्या म्हणजे, बॉडी डिहायड्रेट होणं. उन्हामध्ये थोडा वेळ राहिल्यानंतर शरीरामध्ये पाण्याची कमतरता जाणवू लागते. अनेकदा तर चक्कर येणं आणि अस्वस्थ वाटणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. सतत पाणी प्यायल्याने तोंडाची चव खराब होते. अशातच जलजीरा बॉडी हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतो. यामध्ये वापरण्यात आलेले मसाले चव वाढवून बॉडी हायड्रेट ठेवतात. 

पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी
 
उन्हाळ्यामध्ये सन स्ट्रोकमुळे अनेकदा पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून जलजीरा फायदेशीर ठरतो. यामध्ये असणारं जीरं आणि काळं मीठ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. 

वजन कमी करण्यासाठी 

जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर जलजीरा अत्यंत फायदेशीर ठरतो. यामध्ये लिंबाचा वापर करण्यात आला आहे, जे बॉडी डिटॉक्स करण्यासाठी मदत करतं. जलजीरा एक लो कॅलरी ड्रिंक आहे. जे सतत प्यायल्याने वजन वाढत नाही. पुदिना आणि कोथिंबीर बॉडी डिटॉक्स करण्यासाठी मदत करतात. ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होते. 

टिप : वरील सर्व गोष्टी या केवळ माहिती म्हणून आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. 

Web Title: Weight loss recipe jaljeera detox your body and help in reducing weight know its recipes and benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.