वजन कमी करायचंय?; दररोज एक सफरचंद खा, होतील फायदेच फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 03:52 PM2019-07-21T15:52:04+5:302019-07-21T16:07:54+5:30
वजन कमी करण्याचे सर्व उपाय करून कंटाळला असाल, तसेच काटेकोरपणे डाएट फॉलो करूनही काहीच फायदा होत नसेल तर एकदा सफरचंद खाऊन पाहाच.
वजन कमी करण्याचे सर्व उपाय करून कंटाळला असाल, तसेच काटेकोरपणे डाएट फॉलो करूनही काहीच फायदा होत नसेल तर एकदा सफरचंद खाऊन पाहाच. जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल आणि सकाळच्या डाएटमध्ये काय खावं या विचारात असाल तर आता विचार करणं सोडून द्या. तुम्ही दररोज सकाळच्या डाएटमध्ये सफरचंद खाऊन वजन कमी करण्याची प्रक्रियेचा वेग वाढवू शकता. आता तुम्ही विचारात पडला असाल की, असं खरचं शक्य आहे का? दररोज सफरचंद खाल्याने वजन कमी होतं का? जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी कोणतं सफरचंद खाणं फायदेशीर ठरतं त्याबाबत...
तसं तर सफरचंदाबाबत आपण सर्वच एक गोष्ट नेहमी ऐकतो की, 'अॅन अॅपल अ डे, किप डॉक्टर्स अव्हे' म्हणजेच, जर आपण दररोज एक सफरचंद खात असू तर अनेक आजार दूर राहतात.
सफरचंदामध्ये आढळून येणारी पोषक तत्व
सफरचंदाचं सेवन दररोज करण्याचा सल्ला फक्त वडिलधारी माणसंच नाहीतर डॉक्टर्सही देतात. परंतु, आपण असं अजिबातच करत नाही. पण जर तुम्ही सफरचंदामध्ये आढळून येणाऱ्या पोषक तत्वांबाबत जाणून घेतलतं तर, दररोज एक सफरचंद नक्की खाल. सफरचंदामध्ये फायबर आणि व्हिटॅमिन्स मुबलक प्रमाणात असतात. जे वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.
सोडिअमचं कमी प्रमाणात
सफरचंदामध्ये सोडिअमचे प्रमाण अत्यंत कमी असतं. शरीराला आलेली सूज आणि लठ्ठपणाचं मुख्य कारण शरीरात असणारं सोडिअम अधिक प्रमाण आहे. काही लोकांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढल्यानेही त्यांना लठ्ठपणाचा सामना करावा लागतो.
खरचं सफरचंद वेगाने घटवतं वजन?
- जर तुम्ही वजन कमी करण्याच्या हेतून डाएट प्लॅन करत असाल तर सफरचंद तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी ठरेल. सफरचंदामध्ये वेगाने वजन कमी करण्यासाठी अनेक गुणधर्म आढळून येतात.
- जर तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी एका सफरचंदाचं सेवन करत असाल तर शरीराला आवश्यक फायबर आणि पोषक तत्व मिळतात. यामुळे तुम्हाला बराच वेळ भूकही लागणार नाही.
- सकाळच्या नाश्त्यामध्ये पोषक तत्वांचं सेवन करण्यासोबतच थोडंसंही फॅट्स नसल्यामुळे हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं.
कॅलरी काउंट
एक बाउल कापलेलं सफरचंदामध्ये 65 कॅलरी असतात. तसेच अजिबात फॅट्स नसतात. तसेच एका मध्यम आकाराच्या सफरचंदामध्ये 110 कॅलरी असतात.
अनेक आजारांपासून दूर ठेवतो सफरचंद
अॅन्टीऑक्सिडंट सफरचंदामध्ये मुबलक प्रमाणात असतात. ज्यामुळे कॅन्सर, डायबिटीस, अल्झायमर, पार्किन्सन यांसारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी सफरचंद फायदेशीर ठरतं.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते, त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.