चांगल्या केसांसाठी काय करता नव्हे काय खाता?

By admin | Published: April 12, 2017 05:20 PM2017-04-12T17:20:16+5:302017-04-12T17:38:37+5:30

केस खराब झालेय असं म्हणताना दोष केसांनाच दिला जातो. पण केसांच्या खराब होण्यात दोष केसांचा नाही तर आपला असतो.

What does it do for the good hair? | चांगल्या केसांसाठी काय करता नव्हे काय खाता?

चांगल्या केसांसाठी काय करता नव्हे काय खाता?

Next

केस खराब झालेय असं म्हणताना दोष केसांनाच दिला जातो. पण केसांच्या खराब होण्यात दोष केसांचा नाही तर आपला असतो. केस खराब होतात म्हणजे केसांची मुळं कमजोर होतात. या मुळांचं पोषणं होईल असं त्यांना काही खायलाच भेटत नाही. केसांच्या मुळांना जीवनसत्त्व, खनिजं ही जर पुरेशा प्रमाणात मिळाली तर केस सुदृढ होतात, चमकदार होतात आणि योग्य आहारामुळे टाळूला पुरेसं खाद्य मिळून तोही कोरडा पडत नाही. टाळू चांगला राहिला तर केसही निर्जीव आणि रूक्ष होत नाहीत. शरीरातील अनेक समस्यांविषयी खरंतर डोक्यावरचे केस पहिले बोलत असतात. पण त्यांच्या बोलण्याकडे, सांगण्याकडे लक्ष असतं कोणाचं? शरीरात डिहायडे्रशन व्हायला लागलं तर त्याचा सुगावा सगळ्यात पहिले लागतो तो केसांनाच. केस कोरडे होतात. केस निर्जीव दिसतात म्हणजे ते शरीराला पोषक घटक मिळत नाही हेच सांगत असतात. केस जातात ते वाढलेल्या ताणामुळे. पण हे कोणाच्या लक्षातच येत नाही. केस बरंच काही सांगत असतात. फक्त त्यांची भाषा कळायला हवी. आपल्या खाण्यापिण्याकडेच जर अधिक लक्ष दिलं तर सुंदर केसांसाठी वेगळं काही करावं लागत नाही. केसांचं पोषण करायचं कसं? केसांचं मुख्य खाद्य प्रथिनं असतात. जर आहारातून पुरेशी प्रथिनं मिळत नसतील तर लोहाची कमतरता निर्माण होते आणि त्याचा परिणाम केसांवर होऊन केस गळू लागतात. कडधान्यं, डाळी याद्वारे केसांना आवश्यक प्रथिनं मिळू शकतात. मसूर, सोयाबीन, वाटाणे हे प्रथिनांचे मुख्य स्रोत आहेत. ते जर पुरेशा प्रमाणत शरीरात गेले तर केसांची वाढ होते. कडधान्यं, यीस्ट यासारख्या अन्नघटकांमुळे केस रुक्ष होत नाहीत. लो फॅट डेअरी उत्पादनं जसे दही, दूध, चीज याद्वारे पुरेशा प्रमाणात कॅल्शिअम मिळतं. आणि कॅल्शिअम हा केसांच्या वाढीमधला मुख्य घटक. या पदार्थांमध्ये ड जीवनसत्त्व असतं ज्यामुळे केसांची मुळं पक्की होतात. शरीरातील झिंक कमी झालं असेल तर केस निस्तेज दिसायला लागतात. झिंकची कमतरता भरून काढण्यासाठी जास्त नाही पण रोज नाश्त्यात थोडे का होईना काजू खायला हवेत. डोक्यावरची त्वचा कोरडी पडणं ही समस्या बहुतेक तरुणांमध्ये आढळते. बाहेरच्या प्रदूषणामुळे हे होतंय हा समज शंभर टक्के बरोबर नाही. जर डोक्यावरची त्वचा लाल होऊन खाज येत असेल तर याचा अर्थ खाण्यातून मीठ आणि साखर अतिरिक्त प्रमाणात शरीरात जात आहे. अति साखर आणि मीठ हे टाळूवरचं तेल शोषून घेतं. त्याचा परिणाम त्वचा कोरडी होते. त्यामुळे बाहेरचे जिवाणू टाळूकडे आकर्षित होतात आणि त्याचा परिणाम म्हणजे केसातला कोंडा वाढतो. अतिधूम्रपानामुळेही केस कोरडे होतात. त्यामुळे केसांच्या आरोग्यासाठी तेही टाळायला हवं. आपल्या शरीरासाठी फळं आणि भाज्या आवश्यक असतात. पण काही विशिष्ट प्रकारच्या भाज्या आणि फळं केसांच्या आरोग्यासाठी जास्त आवश्यक असतात. गडद हिरव्या पालेभाज्या आणि पिवळी, नारिंगी रंगाची फळं यामध्ये अ आणि क जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असतात. आणि यांचा आहारात जर नियमित समावेश असेल तर टाळूला तेलनिर्मिती करायला प्रोत्साहन मिळतं. अशा प्रकारे आपलं शरीर केसांसाठी नैसर्गिकपणे कंडीशनरचं काम करू शकतं. ब्ल्यू बेरी, किवी, टोमॅटो, स्ट्रॉबेरीज, संत्री, मोसंबी यासारखी आंबट फळं यात मोठ्या प्रमाणात क जीवनसत्त्व असतं. यामुळे टाळूमधला रक्तप्रवाह सुधारतो. केसांची मुळं घट्ट होतात, केसांची लवचिकता वाढते. यामुळे केस तुटण्याचं प्रमाणही कमी होतं. तसेच केसांना उंदरीही लागत नाही. टाळूचं आरोग्य चांगलं राहिलं तर केसही आपोआप चांगले होतात. यासाठी टाळूला योग्य खाद्य पुरवायला हवं. आणि त्यासाठी गाजर आणि आक्रोड हे फायदेशीर ठरतात. रताळींमध्ये भरपूर पोषक घटक असतात. रताळी खाल्ल्यानं केसांची मुळं पक्की होतात. म्हणून आठवड्यातून एकदा तरी रताळी खायलाच हवी. केसांना योग्य आहार पुरवायला हवा.

Web Title: What does it do for the good hair?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.