ड्रॅगन फ्रूट खाणं काही लोकांसाठी ठरू शकतं नुकसानकारक, जाणून घ्या कुणी टाळावं!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 12:19 PM2024-10-18T12:19:09+5:302024-10-18T12:44:20+5:30

Dragon Fruits Side Effects: हे गुलाबी रंगाचं आकर्षक फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. मात्र, अनेकांना हे माहीत नाही की काही लोकांसाठी हे फळ खूप नुकसानकारक ठरू शकतं.

Who should not consume dragon fruits know the side effect | ड्रॅगन फ्रूट खाणं काही लोकांसाठी ठरू शकतं नुकसानकारक, जाणून घ्या कुणी टाळावं!

ड्रॅगन फ्रूट खाणं काही लोकांसाठी ठरू शकतं नुकसानकारक, जाणून घ्या कुणी टाळावं!

Dragon Fruits Side Effects: वेगवेगळी फळं आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात, हे सगळ्यांनाच माहीत असतं. त्यामुळेच रोज वेगवेगळी फळं खातात. फळांचं सेवन करून शरीराला अनेक फायदे मिळतात आणि अनेक आजारांचा धोका कमी होतो. सध्या बाजारात एका फळाची खूप जास्त चर्चा रंगली आहे. ते म्हणजे ड्रॅगन फ्रूट. हे गुलाबी रंगाचं आकर्षक फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. मात्र, अनेकांना हे माहीत नाही की काही लोकांसाठी हे फळ खूप नुकसानकारक ठरू शकतं. अशात आज आम्ही तुम्हाला हे सांगणार आहोत की, कोणत्या समस्या असलेल्या लोकांनी हे फळ खाऊ नये.

1) एलर्जी होऊ शकते

काही लोकांना ड्रॅगन फ्रूटने एलर्जी होऊ शकते. एलर्जीच्या लक्षणांमध्ये खाज, सूज, चट्टे आणि श्वास घेण्यास समस्या यांचा समावेश होतो. जर तुम्हालाही यातील काही समस्या असेल तर या फळाचं सेवन करू नये.

2) पोटासंबंधी समस्या

ड्रॅगन फ्रूटमध्ये फायबर भरपूर असते. ज्यामुळे पोटासंबंधी समस्या दूर होण्यास मदत मिळते. बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते. पण या फळाचं जास्त प्रमाणात सेवन केलं तर पोटात गॅस आणि जुलाब लागण्याची समस्या होऊ शकते.

3) लघवीचा रंग

ड्रॅगन फ्रूटचा लाल रंग यामुळे काही लोकांच्या लघवीचा किंवा विष्ठेचा रंग गुलाबी किंवा लाल होऊ शकतो. काही लोकांसाठी हा चिंतेचा विषय ठरू शकतो.

4) ब्लड शुगर

ड्रॅगन फ्रूटचं सेवन केल्याने ब्लड शुगर कंट्रोल करण्यास मदत मिळते. पण डायबिटीसच्या रूग्णांनी हे फळ खाणं टाळलं पाहिजे.

5) औषधं घेत असाल तर...

काही केसेसमध्ये ड्रॅगन फ्रूट काही औषधांसोबत मिळून रिअॅक्शन करू शकतं. त्यामुळे तुम्ही कोणत्याही आजाराची औषधं घेत असाल तर या फळाचं सेवन करू नये.

Web Title: Who should not consume dragon fruits know the side effect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.