चिप्स आणि जंक फूड पाहून तोंडाला पाणी का सुटतं?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 11:36 AM2019-02-18T11:36:55+5:302019-02-18T11:37:27+5:30
चिप्स असो वा जंक फूड खाण्याचे अनेक दुष्परिणाम वेळोवेळी कानावर पडत असतात. तरी सुद्धा लोक हे पदार्थ खाण्यासाठी पाण्यात पडल्यासारखे करतात.
चिप्स असो वा जंक फूड खाण्याचे अनेक दुष्परिणाम वेळोवेळी कानावर पडत असतात. तरी सुद्धा लोक हे पदार्थ खाण्यासाठी पाण्यात पडल्यासारखे करतात. पण हे पदार्थ सतत खाण्याची लालसा का होते? का लोक हे पदार्थ खाण्यासाठी आतुर होतात? का सतत हे पदार्थ खावे वाटतात? याचा कधी विचार केलाय का?
तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, जे जंक फूड असतात ते सामान्यपणे बटाट्यासारख्या कार्बोहायट्रेडपासून तयार करतात. पण कार्बोहायड्रेटबाबत मनुष्याला इतकी का ओढ असते? चला जाणून घेऊ यामागचं खरं कारण....
निसर्गाकडून मिळणाऱ्या सर्वच खाद्य पदार्थांमध्ये असा एकही खाद्य पदार्थ नाही ज्यात फॅट आणि कार्बोहायड्रेट भरपूर असतात. म्हणजे हेच बघा ना धान्यांमध्ये जसे की, गहू, धान, बटाटे यात कार्बोहायड्रेट तर भरपूर आहेत, पण फॅट फार कमी आहेत. तेच बीयांच्या पदार्थांमध्ये फॅटचं प्रमाण भरपूर असतं तर कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी असतं. फॅट आणि कार्बोहायड्रेट एकत्र समान असलेली एकच गोष्ट म्हणजे आईकडून मिळणारं दूध. आईच्या दुधात भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेटही असतात आणि फॅटही असतात.
जर्मनीमध्ये झालेल्या एका रिसर्चनुसार, आईच्या दुधात असलेल्या कार्बोहायड्रेट आणि फॅटची सवय लहान मुलांना बालपणीच लागते. आणि ही सवय लहान मुलं त्यांच्या मेंदूमध्ये सुरक्षित करतात. त्यामुळे मुल मोठं झाल्यावरही ही गोष्ट विसरू शकत नाही की, कार्बोहायड्रेट आणि फॅटचा उपयोग त्यांच्यासाठी चांगला आहे. कारण लहान मुलांना बालपणीच हे कळालेलं असतं की, वेगाने पोषण आणि विकासासाठी फॅट आणि कार्बोहायड्रेटचं सेवन फायदेशीर असतं.
जेव्हा मुल मोठं होतं तेव्हा चिप्स किंवा जंक फूड खाताच त्याला याची पुन्हा जाणिव होते की, यात फॅट आणि कार्बोहायड्रेट भरपूर आहेत. आणि हे बघताच त्यांचा मेंदूही त्यांना हे खाण्यासाठी संकेत देतो. कारण मेंदू याप्रकारच्या खाद्य पदार्थांना पोषण देणाऱ्या श्रेणीमध्ये स्टोर करतो. मेंदूला हेच वाटत असतं की, हे पदार्थ सुद्धा आईच्या दुधाप्रमाणे पोषण देणारे पदार्थ आहेत.
बालपणी मेंदूला झालेल्या या सवयीमुळे अनेकांना पुढे जाऊन जाडेपणा, वजन वाढणे या समस्यांचा सामना करावा लागतो. पण लोक त्यांची ही सवय बदलू शकत नाहीत. सध्याच्या लाइफस्टाइलमध्ये तर या प्रकारच्या पदार्थांमुळे वेगवेगळे आजार होतात. जस्त कार्बोहायड्रेट डायबिटीजपासून ते हार्ट अटॅकपर्यंत अनेक समस्या होतात.