नेहमीच पोहे खात असाल पण तुम्हालाही माहीत नसतील 'हे' फायदे, वाचाल तर व्हाल अवाक्...!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 12:33 PM2024-09-13T12:33:17+5:302024-09-13T12:34:19+5:30

Poha Healthy Breakfast: रोज सकाळी नाश्त्यामध्ये पोहे खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. पोहे खाल्ल्याने तुम्ही दिवसभर फ्रेश राहता आणि याने तुमची पचनक्रियाही चांगली राहते. 

Why you should eat daily poha in the morning? Know the benefits | नेहमीच पोहे खात असाल पण तुम्हालाही माहीत नसतील 'हे' फायदे, वाचाल तर व्हाल अवाक्...!

नेहमीच पोहे खात असाल पण तुम्हालाही माहीत नसतील 'हे' फायदे, वाचाल तर व्हाल अवाक्...!

Poha Healthy Breakfast:  भारतातील वेगवेगळ्या भागांमध्ये पोहे हा रोज सकाळचा मुख्य नाश्ता असतो. कारण याने पोटही भरतं आणि शरीराला अनेक पोषक तत्वही मिळतात. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने पोहे बनवले जातात. पोह्यांचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे याने वजन कमी करण्यासही मदत मिळते. पोह्यांमध्ये कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात.

सकाळी जास्तीत जास्त लोक पोहे खातात हे लवकर पचतात. तुम्हीही रोज पोहेच खात असाल पण तुम्हाला याचे फायदे माहीत नसतील तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

रोज सकाळी नाश्त्यामध्ये पोहे खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. पोहे खाल्ल्याने तुम्ही दिवसभर फ्रेश राहता आणि याने तुमची पचनक्रियाही चांगली राहते. 

नियमितपणे एक प्लेट पोहे खाल्ल्याने शरीरातील आयर्नही कमी होत नाही आणि यामुळे तुम्हाला एनीमियाचा धोकाही कमी होतो. तसेच याने शरीरात हीमोग्लोबिनही वाढतं आणि इम्यूनिटीही वाढते. आयर्नमुळे शरीराच्या कोशिकांना ऑक्सीजनही मिळतं.

डायबिटीच्या रूग्णांसाठी फायदेशीर

डायबिटीसच्या रूग्णांसाठी पोह्याचं सेवन फार फायदेशीर असतं. डायबिटीसच्या रूग्णांनी पोहे खाल्ले तर त्यांना भूक कमी लागते आणि त्यांची बीपी लेव्हलही कमी राहते. तुम्हाला माहीत असायला हवं की, एक प्लेट पोह्यांमध्ये 244 कॅलरी असतात.

बरेच लोक पोह्यांमध्ये वेगवेगळ्या भाज्या मिक्स करतात. पोह्यांमध्ये भाज्या मिक्स केल्याने शरीराला व्हिटॅमिन, खनिज आणि फायबर भरपूर मिळतं.

शरीराला ऊर्जा मिळते

पोह्यांमध्ये कार्बोहायड्रेटही भरपूर असतात. कार्बोहायड्रेटने शरीराला ऊर्जा मिळते आणि तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. त्यामुळे तुम्ही रोज पोहे खाऊ शकता.

पोटासाठी चांगले

जर तुम्हाला पोटात काही समस्या असेल तर तुम्ही पोह्याचं सेवन करू शकता. याने पोटाची समस्या दूर होण्यास मदत मिळते. तसेच यात कमी प्रमाणात ग्लूटोना आढळतं, ज्यामुळे पोटाच्या समस्या होत नाहीत.

Web Title: Why you should eat daily poha in the morning? Know the benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.