झटपट तयार करा सुंठाचे लाडू; हिवाळ्यात उत्तम राहील आरोग्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 06:45 PM2018-11-27T18:45:11+5:302018-11-27T18:49:00+5:30
हिवाळ्यातील थंड वातावरणात शरीराला गरम ठेवण्यासाठी आहारात काही बदल करणं गरजेचे असतात. अशावेळी काही आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करण्यात येतो.
हिवाळ्यातील थंड वातावरणात शरीराला गरम ठेवण्यासाठी आहारात काही बदल करणं गरजेचे असतात. अशावेळी काही आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करण्यात येतो. थंडीमध्ये ड्रायफ्रुट्स, गुळ, शेंगदाणे, डिंक आणि सुंठ असे पदार्थ खाण्याचा सल्ला देण्यात येतो. हिवाळा सुरू झाला की, घरातही डिंकाचे, सुंठाचे लाडू तयार करण्यात येतात. जाणून घेऊया सुंठाचे लाडू तयार करण्याची रेसिपी...
साहित्य :
- एक छोटी वाटी सुंठाची पावडर
- 250 ग्रॅम काळा गुळ
- 100 ग्रॅम मेथीचे दाणे
- 25 ग्रॅम डिंक
- 25 ग्रॅम मखाने
- 200 ग्रॅम बारिक तुकडे केलेले ड्रायफ्रुट्स
- 500 मिनी लीटर तूप
- 3 चमचे खसखस
- 200 ग्रॅम खोबऱ्याचा किस
- एक वाटी मनुके
कृती :
- एका कढईमध्ये तूप घेवून ते गरम करून घ्या.
- त्यानंतर त्यामध्ये डिंक तळून घ्या. मध्यम आचेवर तळून घ्या त्यामुळे डिंक व्यवस्थित तळण्यास मदत होईल. तळलेला डिंक एका प्लेटमध्ये काढून घ्या.
- डिंक तळून झाल्यानंतर मखाने तळून एका प्लेटमध्ये काढून घ्या.
- त्यानंतर ड्रायफ्रुट्स गुळामध्ये मिक्स करा.
- खोबऱ्याचा किस, खसखस कढईमध्ये वेगवेगळी भाजून प्लेटमध्ये काढून घ्या.
- कढईमध्ये एक चमचा तूप टाकून त्यामध्ये मनुके टाकून थोडेशे तळून घ्या.
- डिंक आणि मखाने हातानेच कुस्करून घ्या.
- सर्व गोष्टी एका मोठ्या भांड्यामध्ये एकत्र करून घ्या.
- तूप थोडं गरम करून त्या मिश्रणामध्ये एकत्र करा.
- तयार मिश्रणाचे लाडू वळून घ्या.
- तयार लाडू एका डब्ब्यामध्ये भरून ठेवा.
- आरोग्यदायी सुंठाचे लाडू खाण्यासाठी तयार आहेत.