महिलांनी आपल्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा समावेश अवश्य करावा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 05:29 PM2018-08-18T17:29:00+5:302018-08-19T10:20:51+5:30
महिला आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आणि सौंदर्य राखण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय करतात. त्यासाठी अनेक महिला योगाचा किंवा डाएटचा आधार घेतात.
(Image Creadit : istockphoto.com)
महिला आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आणि सौंदर्य राखण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय करतात. त्यासाठी अनेक महिला योगाचा किंवा डाएटचा आधार घेतात. अनेकदा कामाच्या ताणामुळे आरोग्याकडे लक्ष देणं शक्य होत नाही. त्यामुळे खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होतं. परिणामी रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. यामुळे अनेक महिलांना आजांराचा सामना करावा लागतो. काही महिला डाएट करण्याच्या प्रयत्नात खाणं कमी करतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. आरोग्य चांगलं राहण्यासाठी पोषक तत्वांची आवश्यकता असते. त्यामुळे हेल्दी डाएट खाणं गरजेचं असतं. जाणून घेऊयात अशा पदार्थांबाबत ज्यांचा डाएटमध्ये समावेश केल्यानं महिलांना आरोग्य चांगलं राखण्यास मदत होईल.
फळं -
फळांमध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर असून त्यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळण्यास मदत होते. त्यामुळे फळांचा ज्यूस पिणंही फायदेशीर ठरतं. फळांच्या सेवनाने डिहाड्रेशनचा त्रास दूर करण्यास मदत होते. फळामध्ये डाळिंब, सफरचंद, टरबूज यांसारख्या फळांचं सेवन करणं फायदेशी असतं. फळं रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासोबतच आजारांपासूनही बचाव करतात.
हिरव्या पालेभाज्या -
हिरव्या पालेभाज्या महिलांसाठी फायदेशीर ठरतात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये प्रोटीन आणि व्हिटॅमिनसोबतच फायबर मोठ्या प्रमाणावर असतं. त्यामुळे शरीराला पोषक तत्व मुबलक प्रमाणात मिळतात.
पाणी -
पाणी पिणं हे शरीरासाठी चांगलं असतं. शरीरामध्ये पाण्याची कमतरता असेल तर अनेक आजार जडण्याची शक्यता असते. पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासोबतच वजन कमी करण्याचंही काम करतं.
सलाड -
जेवण्याआधी टॉमेटो, काकडी यांसारख्या व्हिटॅमिन असणाऱ्या पदार्थांचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.
दूध आणि दूधापासून तयार केलेले पदार्थ -
दूध आणि दूधापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांचे सेवन केल्यानं भरपूर प्रमाणात पोषण आणि ऊर्जा मिळते. जास्त मलई नसलेल्या दूधाचा आहारात समावेश करावा. त्यामुळे पोषक तत्व मिळतात. त्याचसोबत वजन वाढण्याच्या समस्याही उद्भवत नाहीत.
वेलची -
वेलचीचा उपयोग पदार्थाचा सुगंध वाढवण्यासाठी करण्यात येतो. याव्यतिरिक्त अनेक लोकं तोंडाला येणारी दुर्गंधी घालवण्यासाठी वेलचीचा उपयोग करतात. पण वेलचीचा उपयोग रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठीही होतो. रोज एक वेलची खाल्याने इम्यूनिटी सिस्टीमही चांगली राहते.
लसून -
रक्तप्रवाह सुरळीत होण्यासाठी लसणाचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. तसेच कॅन्ससारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठीही लसून फायदेशीर ठरतो.