World Breastfeeding Week : स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी 'हे' पदार्थ ठरतात वरदान!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 12:51 PM2019-08-06T12:51:21+5:302019-08-06T12:51:34+5:30
1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा आठवडा जागतिक ब्रेस्ट फिडिंग वीक (World Breastfeeding Week) म्हणून साजरा करण्यात येतो. या आठवड्यामध्ये ब्रेस्ट फिडिंगच्या दृष्टीने जनजागृती करणं आणि नवजात बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. जागतिक ब्रेस्ट फिडिंग वीकच्या निमित्ताने जाणून घेऊया अशा पदार्थांबाबत जे स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.
आई झाल्यावर त्या महिलेच्या जबाबदाऱ्याही वाढतात. त्या बाळाला सांभाळणं न्हाऊ-माखू घालणं यांसारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी आईला कराव्या लागतात. पण यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाला दूध पाजणं. तुम्हीही बाळाला दूध पाजत असाल तर सर्वात आधी तुम्हाला तुमच्या आहाराची काळजी घेणं अत्यंत आवश्यक ठरतं. कारण या दिवसांमध्ये तुम्ही ज्या पदार्थांचा आहारा समावेश कराल. त्याच पदार्थांतील पोषक तत्व बाळापर्यंत दूधामार्फत पोहोचतात. त्यामुळे बाळाच्या आरोग्यासाठी तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक असतं.
1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा आठवडा जागतिक ब्रेस्ट फिडिंग वीक (World Breastfeeding Week) म्हणून साजरा करण्यात येतो. या आठवड्यामध्ये ब्रेस्ट फिडिंगच्या दृष्टीने जनजागृती करणं आणि नवजात बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. जागतिक ब्रेस्ट फिडिंग वीकच्या निमित्ताने जाणून घेऊया अशा पदार्थांबाबत जे स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.
आईचं पोषण, बाळाचं आरोग्य
तुम्ही बाळाला स्तनपान करत असाल तर यादरम्यान तुम्ही घेणारा पोषक आहार बाळाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. एवढचं नाहीतर स्तनपानानंतरही बाळाचं आरोग्य त्याला मिळालेल्या पोषक तत्वांवर अवलंबून असतं. त्यामुळे अनेक डॉक्टर्सही आईला या दिवसांमध्ये साधा पण संतुलित आहार घेण्याचा सल्ला देतात.
आहारामध्ये या गोष्टी घ्या लक्षात...
स्तनपान करणाऱ्या महिलांनी संतुलित पोषणाचा समावेश करणं आवश्यक आहे. तसेत जंक फूडपासून शक्य तेवढं दूर राहणचं फायदेशीर ठरतं.
स्टार्चयुक्त पदार्थ, जसं तांदूळ, ब्रेड, व्होल ग्रेनपासून तयार करण्यात आलेले पराठे किंवा चपाती, ओट्स, रवा आणि पास्त या पदार्थांना आपल्या आहारात जागा द्या.
डेअरी प्रोडक्ट्सचाही आहारात समावेश करा, जसं की, एक ग्लास दूध, दह्याचाही आहारात समावेश करा. हेअरी प्रोडक्ट मदर मिल्कसाठी पोषण प्रदान करतात. जर तुम्ही लॅक्टोजमुळे त्रास होत असेल तर, डॉक्टरांकडून सल्ला घेऊन इतर पोषक पदार्थांचा समावेश करा.
काही प्रोटीन म्हणजेच, डाळ, अंडी, मासे यांसारखे पदार्थ स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी अत्यंत आवश्यक ठरतात. तसेच शरीराचा अशक्तपणा दूर करण्यासाठी आणि शरारीची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठीही मदत करतात.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.