World Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 01:27 PM2018-10-16T13:27:39+5:302018-10-16T13:34:36+5:30
वातावरणातील बदलांमुळे सर्दी- खोकला होणं ही एक नॉर्मल गोष्ट आहे. यामध्ये अनेकदा बदललेल्या वातावरणासोबतच तुम्ही घेत असलेला आहारही कारणीभूत ठरतो.
वातावरणातील बदलांमुळे सर्दी- खोकला होणं ही एक नॉर्मल गोष्ट आहे. यामध्ये अनेकदा बदललेल्या वातावरणासोबतच तुम्ही घेत असलेला आहारही कारणीभूत ठरतो. अनेकदा ताप, सर्दी, खोकला यांसारखे आजार झाल्यास कोणते पदार्थ खाणं चांगलं याचा सल्ला देण्यात येतो. परंतु अशावेळी कोणते पदार्थ खाणं टाळावं हे सांगितलं जात नाही. खोकला झाला असल्यास सूप, आलं, मध, व्हिटॅमिन-सी आणि मसालेदार पदार्थ खाणं फायदेशीर असतं. परंतु काही पदार्थ असेही असतात जे सर्दी- खोकला झाल्यानंतर खाणं टाळणं फायदेशीर असतं.
प्रोसेस्ड फूड
खोकला झाला असल्यास प्रोसेस्ड फूड खाणं टाळावं. त्यामध्ये व्हाईट ब्रेड, व्हाईट पास्ता, बेक्ड फूड, चिप्स यांसारख्या पदार्थांचा समावेश होतो. याव्यतिरिक्त हिरव्या पालेभाज्या खाणं फायदेशीर ठरतं.
फ्राईड फूड
फ्राईड फूड्स खोकला झाला असल्यास फार नुकसान पोहोचवतात. त्यामुळे फ्रेंच फ्राईज आणि जंक फूड खोकला झालेला असाना खाणं टाळावं.
आबंट फळं
सायट्रिक अॅसिड असलेली फळं खाल्यामुळे खोकला वाढतो. त्यामुळे अशी फळं खाणं टाळावं. याव्यतिरिक्त अननस, कलिंगड यांसारखी फळं खाणंही टाळावं.
दूध
खोकल्यामध्ये दूध आणि दूधापासून तयार करण्यात आलेले पदार्थ खाणं टाळावं. हे पदार्थ खाल्याने श्वास घेण्यास त्रास होतो, तसेच खोकला वाढून कफही जास्त होतो.
कुकीज आणि बिस्किट
सर्दी-खोकला कुकीज, बिस्किट आणि बाजारात किंवा बेकरीमध्ये मिळणारे पदार्थ खाणं टाळावं. हे पदार्थ तयार करण्यासाठी डालडा वापरण्यात येतो. त्यामुळे खोकला आणखी वाढण्याची शक्यता असते.