World Milk Day: आयुर्वेदानुसार दूध पिण्याची 'ही' आहे योग्य वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 11:54 AM2019-06-01T11:54:29+5:302019-06-01T11:57:00+5:30
दूध आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी किती फायद्याचं आहे हे सर्वांनाच माहीत आहे. केवळ लहानच नाहीतर मोठेही दूधाच्या मदतीने आरोग्य चांगलं ठेवू शकतात.
दूध आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी किती फायद्याचं आहे हे सर्वांनाच माहीत आहे. केवळ लहानच नाहीतर मोठेही दूधाच्या मदतीने आरोग्य चांगलं ठेवू शकतात. याने शरीराला कॅल्शिअम मिळतं. वेगवेगळ्या आजारांसोबतच तुम्हांला हाडांच्याही समस्येपासून सुटका मिळते. पण दूध कोणत्या वेळेत पिणे जास्त फायद्याचं असतं हे तुम्हाला माहीत आहे का? दूध कधीही पिणे फायद्याचे नाही. त्यामुळे जाणून घेऊया दूध पिण्याची योग्य वेळ....
ऑफिसला जाण्याच्या धावपळीत अनेकजण चांगल्याप्रकारे नाश्ता करायला विसरतात. दुपारी थंड जेवण खातात. काही लोक लंचही पूर्ण करत नाहीत. अशावेळी रात्रीचं जेवण अनेकजण पोटभर करतात. पण रात्री हलकं जेवण करणे योग्य मानलं जातं. काही लोक असेही असतात जे पोटभर जेवण केल्यावरही एक ग्लास दूध पितात. यामुळेच त्यांना काही हानिकारक गोष्टींचा सामना करावा लागतो.
कधी आणि केस प्यावे दूध?
1. एक्सपर्टनपसार, जनरली महिला त्यांच्या लहान मुलांना सकाळी आंघोळ केल्याशिवाय एक ग्लास दूध देतात. त्यानंतर मुलं टॉयलेटला जातात किंवा आंघोळीला जातात. असे केल्याने दूध सहजपणे पचत नाही. त्यामुळे प्रयत्न हा करा की त्याला आंघोळ झाल्यावर दूध द्या.
2. रात्री केवळ गरमीच्या दिवसातच दूध प्यावे.
3. रात्री लहान मुलांना दूध देऊ नये, कारण ते पचन्यासाठी जड होतं.
4. दूधासोबत कोणत्याही आंबट फळांचं सेवन करू नका. असे केल्यास तुम्हाला गॅसची समस्या होऊ शकते.
5. खोकला, सर्दी किंवा कफ असलेल्या लोकांनी दूध घेऊ नये. खासकरून रात्री दूध पिऊ नये.
6. ज्याप्रकारे तहान लागल्यावर पाणी पितात, भूक लागल्यावर जेवण करतात तसेच भूक लागल्यावर दूध प्यावे.
7. ज्या लोकांना दूध पचायला जड असतं त्यांनी दूधात थोडं सूंठ घालून प्यावे.
8. रात्री जेवण कमी कर. जेवणानंतर काही तासांनी तुम्ही एक ग्लास दूघ पिऊ शकता.
9. सकाळी आंघोळ केल्यावर आणि सायंकाळी दूध पिणे चांगलं मानलं गेलं आहे. त्यामुळे जेव्हा मुलं खेळून येतात तेव्हा त्यांना एक ग्लास दूध द्यावे.
सकाळच्यावेळी दूध पिण्याचे फायदे :
- जर तुम्हाला दिवसाची उत्तम सुरुवात करण्याची गरज असेल तर सकाळी एक ग्लास दूध पिणं फायदेशीर ठरतं.
- दूधामध्ये पोटॅशिअम, कॅल्शिअम, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, प्रोटीन आणि व्हिटॅमिन्स यांसारखी अनेक पोषक तत्व असतात.
सकाळी लवकर दूध पिण्याचे तोटे :
- जर तुम्ही सकाळी दूध पित असाल, तर हे तुमच्यासाठी फार हेव्ही मील असू शकतं.
- सकाळी लवकर हेव्ही मील घेतल्याने पचनक्रिया बिघडू शकते. ज्यामुळे पोटदुखीचा त्रास सहन करावा लागतो.
- जास्तीत जास्त डॉक्टर्स आणि डाएटिशन्सनुसार, सकाळच्या वेळी आपल्या पचनक्रियेवर जास्त भार टाकणं चांगलं नाही. त्यामुळे सकाळी सकाळी दूध पिणं टाळलं पाहिजे.
रात्री दूध पिण्याचे फायदे :
- रात्री दूध पिऊन झोपल्याने पोट बराच वेळ भरल्याप्रमाणे राहते आणि तुम्हाला झोपल्यावर भूक लागत नाही. ज्यामुळे तुमची झोपमोड होत नाही.
- दूध आपल्या शरीराच्या स्नायूंना रिलॅक्स करतं आणि डोक्यात सुरू असलेले विचार आणि टेन्शन दूर करतं. परिणामी झोप चांगली लागते.
- तुम्हाला तुमची स्किन हेल्दी ठेवायची असेल तर रात्री दूध पिऊन झोपा.
रात्री दूध पिण्याचे तोटे :
- अशा काही व्यक्ती ज्या लॅक्टोज इन्टॉलरेंटच्या समस्येने त्रस्त आहेत. जर रात्री दूध प्यायल्या तर पोटदुखीच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो.
- रात्री दूध प्यायल्याने शरीराची इन्सुलिनची पातळी वाढते.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.